शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

फुल चार्जवर २०० किमीची रेंज, भन्नाट फीचर्स; १,९९९ रुपयांत बुक करता येणार 'ही' स्वदेशी Electric Scooter

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:24 IST

Electric Vehicles : सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकजण पर्यायी वाहनांकडे, तसंच प्राधान्यानं इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहेत.

Electric Vehicle In India : स्वदेशी कंपनी ओकायानं (Okaya) एक शक्तिशाली इलेक्ट्रीक स्कूटर (Electric Scooter) लाँच केली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर, ओकायाची ही इलेक्ट्रीक स्कूटर 200 किमीची रेंज देते. ओकायाच्या या इलेक्ट्रीक स्कूटरचे नाव फास्ट (Faast) आहे. ओकाया फास्टचे बुकिंगही सुरू झालं असून ग्राहक ही इलेक्ट्रीक स्कूटर ओकाया येथून फक्त 1,999 रुपये भरून बुक करू शकतात. भारतीय बाजारपेठेत ओकायाची ही इलेक्ट्रिक स्कूटर ओलाच्या S1, TVS च्या iQube, Bounce Infinity E1 आणि बजाज चेतक इलेक्ट्रीकशी स्पर्धा करेल.

Okaya Faast इलेक्ट्रीक स्कूटर उत्कृष्ट लूकसह आली आहे. स्कूटरमध्ये ऑल-एलईडी लाइटिंग सेटअप आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो. या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 4.4kW बॅटरी पॅक देण्यात आले असून यामुळे ही स्कूटरला जास्तीत जास्त 200 किमीची रेंज देते. ओकाया फास्टमध्ये मॅक्सी स्कूटरसारखं डिझाईन आहे आणि ती ड्युअल-टोन पेंट स्कीमसह येते. इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा डीलरशिपवर करता येऊ शकते. पुढील वर्षी जानेवारीच्या अखेरीस या इलेक्ट्रीक स्कूटरची डिलिव्हरी सुरू होईल.

70 किमी प्रति तास कमाल वेगओकायाची ही इलेक्ट्रीक स्कूटर रेड, ग्रे, ग्रीन आणि व्हाईट कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. ओकाया फास्ट इलेक्ट्रीक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 89,999 रुपये आहे. स्कूटरमध्ये लिथियम फॉस्फेट बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ओकाया फास्ट इलेक्ट्रीक स्कूटरच्या चाकांना डिस्क/ड्रम ब्रेक किंवा दोन्हीचे कॉम्बिनेशन दिले जाऊ शकते. स्कूटरच्या पुढील बाजूस स्टँडर्ड टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनो शॉक अथवा ड्युअल शॉक युनिट दिले जाऊ शकतात.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन