शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:28 IST

आता कंपनीने या कारला जलद चार्जिंग स्पीडही दिला आहे, यामुळे ही कार पूर्वीपेक्षाही अधिक व्यावहारिक बनली आहे. तर जाणून घेऊयात अपडेट्ससंदर्भात...

टाटा मोटर्सच्या सर्वात लोकप्रिय आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक असलेली टाटा पंच ईव्ही (Tata Punch EV) आता आणखी बदलली आहे. फ्यूचरिस्टिक डिझाइन आणि प्रगत वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेली पंच ईव्ही आता दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली आहे. याच बरोबर, कंपनीने तिला जलद चार्जिंग स्पीडही दिला आहे, यामुळे ती पूर्वीपेक्षाही अधिक व्यावहारिक अथवा प्रॅक्टिकल बनली आहे. तर जाणून घेऊयात अपडेट्ससंदर्भात...

नवे कलर ऑप्शन्स -Punch EV मध्ये आता प्युअर ग्रे आणि सुपरनोव्हा कॉपर्सचा समावेश करण्यात आला आहे. या दोन कलर ऑप्शन्सनंतर ही कार आता एकूण सात कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल. यात एम्पॉवर्ड ऑक्साइड, सीवीड, फियरलेस रेड, डेटोना ग्रे आणि प्रिस्टाइन व्हाइट सारख्या कलर्सचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, हे सर्व कलर ब्लॅक रूफसह डुअल-टोन शेड्समध्ये मिळतील. यामुळे कार आधिक स्टायलीश दिसेल.

पुर्वीपेक्षा अधिक फास्ट चार्ज -नव्या अपडेटसह पंच ईव्हीची DC फास्ट चार्जिंग स्पीड फास्ट करण्यात आली आहे. पूर्वी 10% ते 80% पर्यंत चार्ज करण्यासाठी 56 मिनिटे लागत होते. आता हे काम केवळ 40 मिनिटांत होईल. याशिवाय, केवळ 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये कार जवळपास 90 किमीपर्यंतचे अंतर चालण्यास सक्षम होईल.

टाटा पंच ईव्हीचे फीचर्स -पंच इव्ही केवळ स्टायलिशच नाही, तर टेक्नॉलॉजीनेही परिपूर्ण आहे. या कारमध्ये 10.25-इंचाचे डुअल स्क्रीन सेटअप (इंफोटेनमेंट आणि इंस्ट्रूमेंट क्लस्टरसाठी) देण्यात आले आहे. याशिवाय वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, रिअर AC व्हेट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर प्युरीफायर आणि 6-स्पीकर साउंड सिस्टिमही देण्यात आले आहे. कंफर्टसाठी या कारला व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स,अ‍ॅम्बियंट लाइटिंग आणि सिंगल-पेन सनरूफही देण्यात आले आहे. 

सेफ्टी फीचर्सही कार सेफ्टीच्या बाबतीतही प्रगत आहे. या कारला सहा एअर बॅग, 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, हिल होल्ड कंट्रोल आणि हिल डिसेंट कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहेत. हे सर्व फीचर्स या कारला सेगमेंटची सर्वात सुरक्षित आणि विश्वासू इलेक्ट्रिक कारपैकी एक बनवतात. 

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकार