शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ Activa चं नाही, या चार स्कूटर्सचीही होतोय तुफान विक्री! किंमत ६८,६२५ पासून पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 21:10 IST

भारतीय बाजारपेठेत स्कूटरला नेहमीच मागणी असते. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये स्कूटरना त्यांच्या विशेष उपयुक्ततेमुळे जास्त मागणी आहे.

भारतीय बाजारपेठेत स्कूटरला नेहमीच मागणी असते. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये स्कूटरना त्यांच्या विशेष उपयुक्ततेमुळे जास्त मागणी आहे. घर ते ऑफिस किंवा नियमित शहरातील प्रवासासाठी आणि अगदी शॉपिंगसाठीही स्कूटर हे वाहतुकीचे सर्वात सोयीचे साधन मानले जाते. या सेगमेंटमध्ये होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाची तोड नाही, ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. अलीकडेच कंपनीने नवीन ॲडव्हान्स्ड फीचर्ससह Activa Smart लाँच केली आहे. पण Honda Activa व्यतिरिक्त, इतर अनेक मॉडेल्स आहेत ज्यांची विक्री चांगली होते. चला तर मग पाहूया त्या स्कूटर्स-

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) शेअर केलेल्या अलीकडील डेटानुसार, जानेवारी 2023 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप 5 स्कूटरच्या यादीनुसार देशातील इलेक्ट्रीक स्कूटर्स ICE इंजिनद्वारे चालणाऱ्या पारपारिक स्कूटर्सची डिमांड कमी झाली आहे. तथापि, इतर स्कूटरबद्दल बोलण्याआधी, हे जाणून घ्या की, गेल्या जानेवारीमध्ये, Honda ने त्याच्या प्रसिद्ध स्कूटर Activa चे एकूण 1,30,001 युनिट्स विकले आहेत. जे मागील वर्षी याच महिन्यात 1,43,234 युनिट होते. 

जानेवारी महिन्यात होडा ॲक्टिव्हाच्या 1,30,001, टिव्हीएस ज्युपिटरच्या 54,484 युनिट्सची विक्री झाली होती. तर दुसरीकडे सुझुकी ॲक्सेसच्या 45,497, टीव्हीस एनटॉर्क 24,362, होंडा डिओच्या 18,752 युनिट्सची विक्री झाली. टीव्हीएस ज्युपिटरची सुरूवातीची किंमत 69,990 रुपये आहे. तर ज्युपिटर 125 ची किंमत 82,825 रुपये आहे. सुझुकी ॲक्सेस 125 ची किंमत 77,900 रुपये आहे, तर टीव्हीएस एन टॉर्क 125 ची किंमत 78,506 रुपये आहे. तर दुसरीकडे होंडा डिओची सुरुवातीची किंमत 68,625 रुपये आहे.

टॅग्स :HondaहोंडाAutomobileवाहन