दहा लाखांच्या रेंजमध्ये एक-दोन नाहीत, 26 एसयुव्ही, हॅचबॅक येतात; तुम्हाला कोणती घ्यायचीय... पहा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 01:24 PM2023-03-07T13:24:59+5:302023-03-07T13:25:35+5:30

तुमचे बजेट दहा लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही आज एसयुव्ही देखील घेऊ शकणार आहात. यामध्ये कॉ़म्पॅक्ट एसयुव्ही, कॉम्पॅक्ट सेदान आणि हॅचबॅक कार आहेत.

Not one or two in the range of 10 lakhs rs budget, 26 SUVs, hatchbacks come; Which one do you want to buy... See the list | दहा लाखांच्या रेंजमध्ये एक-दोन नाहीत, 26 एसयुव्ही, हॅचबॅक येतात; तुम्हाला कोणती घ्यायचीय... पहा लिस्ट

दहा लाखांच्या रेंजमध्ये एक-दोन नाहीत, 26 एसयुव्ही, हॅचबॅक येतात; तुम्हाला कोणती घ्यायचीय... पहा लिस्ट

googlenewsNext

आज महागाईच एवढी वाढलीय की कारच्या किंमती पाच लाखांपासून सुरु झाल्या आहेत. यामुळे कंपन्यांनी देखील सहा ते १० लाखांत छोट्या एसयुव्ही, हॅचबॅक लाँच केल्या आहेत. तसे पहायला गेले तर आपल्याला दोन चारच कार आठवतात ज्या परवडणाऱ्या बजेटमध्ये आहेत. परंतू, तसे नाहीय आज भारतीय बाजारात दोन चार नाही तर २६ च्या आसपास बजेटमधील कार आहेत. 

तुमचे बजेट दहा लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही आज एसयुव्ही देखील घेऊ शकणार आहात. यामध्ये कॉ़म्पॅक्ट एसयुव्ही, कॉम्पॅक्ट सेदान आणि हॅचबॅक कार आहेत. मारुतीच्या अल्टो पासून ते नेक्सॉनपर्यंत या कार आहेत. या कारची विक्रीही जोरात सुरु असते. सध्या हॅचबॅक आणि सेदान कारला थोडे थंड दिवस आले असले तरी कॉम्पॅक्ट एसयुव्हीला चांगलेच दिवस आले आहेत. अनेकजण त्यांच्याकडील कार अपग्रेड करत असल्याने बाजाराचा कल थोडासा बदलू लागला आहे. 

चला पाहुयात १० लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 11 पॉपुलर एसयूवींची लिस्ट...

महिंद्रा थार किंमत 9.99 लाख रुपयांपासून
टाटा नेक्सॉन किंमत 7.80 लाख रुपयांपासून
टाटा पंच किंमत 6 लाख ते 9.54 लाख रुपयांपासून
मारुती ब्रेझा किंमत 8.19 लाख रुपयांपासून
महिंद्रा बोलेरोची सुरूवात 9.53 लाख रुपयांपासून
ह्युंदाई व्हेन्यू किंमत 7.68 लाख रुपयांपासून
महिंद्रा एक्सयूव्ही 300 किंमत 8.41 लाख रुपयांपासून
किआ सोनेट किंमत 7.69 लाख रुपयांपासून
निसान मॅग्नाइट किंमत 6 लाख रुपयांपासून
रेनॉल्ट किगर किंमत 6.50 लाख रुपयांपासून
सिट्रॉईन सी ३ किंमत ५.९८ लाखांपासून

१० लाखांच्या आतील १० हॅचबॅक
मारुती अल्टो के 10 ची किंमत 3.99 लाख ते 5.95 लाख रुपये
मारुती वॅगन आर किंमत 5.53 लाख ते 7.41 लाख रुपये
टाटा अल्ट्रोज किंमत 6.45 लाख ते 10.40 लाख रुपये
टाटा टियागो किंमत 5.54 लाख ते 8.05 लाख रुपये
ह्युंदाई आय 20 ची किंमत 7.19 लाख ते 11.83 लाख रुपये आहे
मारुती बलेनो किंमत 6.56 लाख ते 9.83 लाख रुपये
मारुती स्विफ्ट किंमत 6 लाख ते 8.98 लाख रुपये
मारुती इग्निस किंमत 5.82 लाख ते 8.14 लाख रुपये
मारुती ईकोची किंमत 5.25 लाख ते 6.51 लाख रुपये आहे
ह्युंदाई ग्रँड आय 10 निओस किंमत 5.68 लाख ते 8.46 लाख रुपये

१० सेदान कार
मारुती डीझायरची किंमत 4.44 लाख रुपयांपासून
ह्युंदाई ऑरा किंमत 6.30 लाख ते 8.87 लाख रुपये
होंडा 6.89 लाख ते 9.48 लाख रुपये
टाटा टिगॉर किंमत 6.20 लाख ते 8.90 लाख रुपये
मारुती सियाझ किंमत 9.20 लाख ते 12.19 लाख रुपये


 

Web Title: Not one or two in the range of 10 lakhs rs budget, 26 SUVs, hatchbacks come; Which one do you want to buy... See the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.