शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आता Driving Licence आणि RC सोबत ठेवण्याची गरज नाही, या पद्धतीने कापले जाणार नाही चलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 12:49 IST

Driving Licence : केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) सोबत बाळगणे आवश्यक नाही.

नवी दिल्ली : वाहन चालवताना तुम्ही सोबत ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) न ठेवल्याबद्दल तुमचे चलन कापले गेले असेल. कारण ही कागदपत्रे ड्रायव्हरकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र आता ही सर्व कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज नाही.

केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) सोबत बाळगणे आवश्यक नाही. त्याऐवजी, तुम्ही ही कागदपत्रे एमपरिवहन मोबाइल अॅपमध्ये (mParivahan mobile app) साठवू शकता. गरज पडल्यास ही कागदपत्रे एमपरिवहन मोबाइल अॅपद्वारे अधिकाऱ्यांना दाखवता येतील. हे 100 टक्के वापरकर्त्यांसाठी स्वीकार्य, प्रमाणित आणि सोयीस्कर आहे.

mParivahan mobile app मध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जोडण्यासाठी स्पेट बाय स्पेट प्रोसेस जाणून घ्या...

Step 1: सर्वात आधी  Google Play Store वरून mParivahan अॅप डाउनलोड करा.

Step 2: तुमचा मोबाईल नंबर वापरून साइन अप करा. तुम्हाला एक OTP मिळेल. अॅपवर एंटर करा आणि रजिस्टर करा.

Step 3: आता, तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत - DL (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि RC (रजिस्ट्रेशन सर्टिफिकिट).

Step 4: तुमचा DL नंबर एंटर करा.

Step 5: व्हर्च्युअल DL साठी  "Add to My Dashboard" वर क्लिक करा.

Step 6: जन्मतारीख एंटर करा आणि तुमचा DL तुमच्या डॅशबोर्डवर जोडला जाईल.

अशाप्रकारे करा वापरस्क्रीनच्या टॉपवर तुमचा व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स पाहण्यासाठी डॅशबोर्ड बटणावर क्लिक करा, एकदा तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर, तुमचा DL तपशील आणि एक QR कोड दिसेल. हा कोड कागदपत्रांची सर्व आवश्यक माहिती स्कॅन करण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी अधिकारी वापरतात. तुम्ही अॅपमध्ये तुमच्या वाहनांचे आरसी बुक तपशील देखील जोडू शकता.

अनेक वाहने जोडू शकताmParivahan अॅपवर, व्यक्ती किंवा व्यक्तीद्वारे वापरलेली अनेक वाहने जोडता येतात. उदाहरणार्थ, पत्नीने नोंदणी केलेले वाहन चालवणारा पती त्याच्या अॅपवर वाहन तपशील देखील जोडू शकतो. त्याचप्रमाणे, ड्रायव्हिंग लायसन्सचे तपशील अनेक मोबाइल डिव्हाइसवर जोडले जाऊ शकतात.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानAutomobileवाहन