शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Nissan Kicks Review: निस्सानने दिली किक; खड्डेमय रस्त्यांसाठी सर्वोत्तम पण...

By हेमंत बावकर | Updated: January 27, 2020 14:27 IST

निस्सान या जपानच्या वाहन निर्माता कंपनीने भारतात काही वर्षांपूर्वी पाऊल ठेवले आहे. यानंतर डॅटसन हा ब्रँडही आणला आहे.

ठळक मुद्देकोणत्याही कारचे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? उत्तम मायलेज की आरामदायीपणा की सुरक्षा?काही कंपन्या भारतीय बाजारात सध्या संघर्ष करत आहेत. यापैकीच ही एक. निस्सानने चालकासाठीच ही कार बनविलेली नाही हे यावेळी दिसून आले.

निस्सान या जपानच्या वाहन निर्माता कंपनीने भारतात काही वर्षांपूर्वी पाऊल ठेवले आहे. यानंतर डॅटसन हा ब्रँडही आणला आहे. निस्सानची किक्स ही सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर धावत आहे. एकंदरीत क्वालिटी आणि दणकटपणा हवा असेल तर ही कार सरस आहे. लोकमतच्या टीमकडे ही कार रिव्ह्यूसाठी आली होती. 

कोणत्याही कारचे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? उत्तम मायलेज की आरामदायीपणा की सुरक्षा? काहींच्या मते उत्तम मायलेज हे कारचे महत्वाचे वैशिष्ट्य असते. उत्तम मायलेज पैसे वाचविणारे असले तरीही एवढे पैसे घालून जर आतील जीव धोक्यात असेल तर काय उपयोगाचे. या विचाराच्या काही कंपन्या भारतीय बाजारात सध्या संघर्ष करत आहेत. यापैकीच ही एक. आम्ही किक्स जवळपास 280 किमी ही कार खड्डेमय रस्ते, उंचसखल भागातून चालविली.

निस्सानने चालकासाठीच ही कार बनविलेली नाही हे यावेळी दिसून आले. तर प्रवाशांनाही प्रवास सुखकर व्हावा असा सीट कंफर्ट देण्यात आला आहे. बिल्ड क्वालिटी उत्तम आहे. खड्ड्यांमधून जाताना धक्के जाणवत नाहीत. वळणावरही कार योग्य संतुलन राखते. ड्रायव्हर व्हिजिबिलीटीही चांगली आहे. बॉडीरोल जाणवत नाही. खड्ड्यांचे धक्के स्टिअरिंगला जाणवत नाहीत. टायर मोठे असल्याने आणि सस्पेंशनही चांगले असल्याने खड्ड्यांची किक आतमध्ये जाणवली नाही. 

सर्वात महत्वाचे म्हणजे रात्रीच्यावेळी प्रवासासाठी एलईडी लाईटसोबत हॅलोजन लाईटही देण्यात आली आहे. जी कमी आम्हाला रेनॉल्ट कॅप्चरमध्ये जाणवली होती. कॅप्चरमध्ये एलईडी लाईट असल्याने धूर, धुके, पावसाच्या वेळी समोरील दृष्यमानता कमीच झाली होती. मात्र, किक्समध्ये हॅलोजनचा पिवळा फोकस असल्याने रस्ता स्पष्ट दिसतो. दुसरी बाब म्हणजे पार्किंग साठी 360 अंशाचा कॅमेरा देण्यात आला होता. किक्स लाँच होऊन साधारण वर्ष झाले आहे. या काळात अन्य कंपन्या साधे सेन्सरही देत नव्हत्या. या कॅमेरामुळे पार्किंग करतेवेळी कोणतीही समस्या जाणवत नाही. 

अंतर्गत रचनाडॅशबोर्ड, सीटची क्वालिटी दर्जेदार आहे. स्टार्ट-स्टॉप बटन, युएसबी चार्जिंग, रिअर एसी व्हेंट, 8.0 A-IVI touchscreen, अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, कमी टर्निंग रेडिअस, ड्युअल एअरबॅग, डिझेलसाठी इको मोड अशी फिचर्स देण्यात आली आहेत. लगेज स्पेसही भरपूर म्हणजेच 400 लीटर आहे. 

इंजिन आणि परफॉर्मन्समायलेजचा विचार करणार असाल तर ही कार यासाठी नाही. आम्हाला 13.9 किमी प्रती लीटरचे मायलेज दिले. 50 लीटरची टाकी  ही डिझेल इंजिनची 1.5 लीटर मॅन्युअल ट्रान्समिशन ड्युअल टोन रंगातील एसयुव्ही होती. हिल स्टार्ट असिस्टमुळे चढावाला कारने पुढे जाण्यासाठी त्रास दिला नाही. पिकअप आणि वेगाच्या बाबतीत कार सरस ठरली. म्युझिक सिस्टिमही चांगली होती. 

कमतरता काय?कारचे मायलेज कमी आहे. याच रेंजमधील इंजिन असलेल्या कार 20 ते 22 चे मायलेज देतात. याकडे कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे. इको मोडवर आम्हाला 13 ते 14 चे मायलेज मिळाले. इन्फोटेन्मेंट सिस्टीम जरी चांगली असली तरीही फोनवर मॅप कनेक्ट केल्यास कनेक्टीव्हीटी वारंवार तुटत होती. यामुळे रस्त्याकडेला थांबून पुन्हा फोन सिस्टिमला कनेक्ट करावा लागत होता. हे खूपच त्रासदायक होते. नवख्या प्रदेशात अशी समस्या वारंवार उद्भवल्यास हा प्रवास अडचणींचा ठरतो. स्टिअरिंगचा रॉड वळताना अनेकदा ब्रेकवर पाय ठेवल्यावर पायाला लागतो. यामुळे काहीसे अनकंफर्टेबल वाटते. ड्रायव्हरचा आर्मरेस्ट हा स्टोरेज स्पेस असलेला नाही. 

टॅग्स :Nissanनिस्सानRenaultरेनॉल्टTataटाटा