मारुतीची जिम्नी खरेदी करण्याची उत्तम संधी, फेस्टिव्हल सीजनमध्ये कंपनी देते १ लाखांपर्यंत ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:38 PM2023-10-20T19:38:19+5:302023-10-20T19:39:00+5:30

५० हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज किंवा लॉयल्टी बोनसही मिळत आहे.

news maruti jimny discount offers up to rs 1 lakh | मारुतीची जिम्नी खरेदी करण्याची उत्तम संधी, फेस्टिव्हल सीजनमध्ये कंपनी देते १ लाखांपर्यंत ऑफर्स

मारुतीची जिम्नी खरेदी करण्याची उत्तम संधी, फेस्टिव्हल सीजनमध्ये कंपनी देते १ लाखांपर्यंत ऑफर्स

नवी दिल्ली : मारुती ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. मारुती सुझुकी सणासुदीच्या काळात आपल्या ऑफ-रोड एसयूव्ही जिम्नीवर उत्तम ऑफर देत आहे. देशभरातील नेक्सा डीलरशिपवर या कारच्या एंट्री लेव्हल जेटा व्हेरिएंटवर १ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि बेनिफिट्स दिले जात आहेत. तसेच, जिम्नीच्या या व्हेरिएंटच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ऑप्शनवर ५० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच ५० हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज किंवा लॉयल्टी बोनसही मिळत आहे.

मारुती सुझुकी जिम्नी जूनमध्ये बाजारात दाखल झाली होती. कारचा लुक खूपच पॉवरफुल आहे. यात एक मोठी ग्रील, मस्क्युलर बोनेट आणि गोल हेडलाइट्स फॉग लॅम्प, ब्लॅक आउट बी-पिलर्स ओआरव्हीएम आणि अलॉय व्हील मिळतात. या कारच्या केबिनमध्ये ७.० इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल सारख्या अनेक शानदार फीचर्स मिळत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून यामध्ये सहा एअरबॅग, ABS, ESP आणि ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल आहेत. या कारची सुरुवातीची किंमत १२.७४ लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Jimny इंजिन
मारुती जिम्नीमध्ये १.५ लीटर, ४ सिलेंडर, K15B पेट्रोल इंजिन आहे. जे ६००० rpm वर १०१ bhp पॉवर आणि ४००० rpm वर १३० Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ४ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शनही आहे. जेटा लाइनअपमधील एंट्री लेव्हल व्हेरिएंट आहे. ज्याची किंमत मॅन्युअलसाठी १२.७४ लाख रुपये आणि ऑटोमॅटिकसाठी १३.९४ लाख रुपये आहे. दरम्यान, कंपनी दरमहा जवळपास ३ हजार युनिट्सची विक्री करते.

Web Title: news maruti jimny discount offers up to rs 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.