शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

TVS ची नवीन 125cc स्कूटर Jupiter 125 लाँच, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 20:16 IST

new tvs jupiter 125 launched : प्रीमियम लुक देण्यासाठी कंपनीने स्कूटरला क्रोम टच दिला आहे. स्कूटरच्या बाजूच्या आरशांवर क्रोममधून ड्युअल टोन कलर देण्यात आला आहे.

दुचाकी कंपनी TVS मोटर कंपनीने आपल्या लोकप्रिय स्कूटर ज्युपिटरचे 125cc व्हर्जन TVS Jupiter 125 गुरुवारी लाँच केले आहे. कंपनीने या स्कूटरच्या डिझाईन आणि लुकला अतिशय वायब्रेंट आणि फ्रेश टच  दिला आहे. (new tvs jupiter 125 launched know price features details rival for honda activa suzuki access 125)

कंपनीने TVS Jupiter 125 मध्ये पेट्रोलसाठी नवीन इनलेट दिले आहे. पूर्वी ते सीटच्या मागे असायचे, परंतु यामध्ये ते हँडलच्या अगदी खाली दिले आहे. कंपनीचे हे मॉडेल ड्रम, ड्रम अॅलॉय आणि डिस्क व्हेरिएंटमध्ये येईल.

TVS Jupiter 125 ला प्रीमियम लुक देण्यासाठी कंपनीने स्कूटरला क्रोम टच दिला आहे. स्कूटरच्या बाजूच्या आरशांवर क्रोममधून ड्युअल टोन कलर देण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये एलईडी हेडलॅम्प, थ्रीडी लोगो, डायमंड कट अॅलॉय व्हील्स देखील आहेच. कंपनीने Dawn Orange, IndiBlue, Pristine White आणि Titanium Grey कलरमध्ये लॉन्च केले आहे.

याचबरोबर, TVS Jupiter 125 मध्ये सिंगल सिलिंडर 4-स्ट्रोक, एअर-कूल्ड, 124.8cc चे इंजिन आहे. हे जास्तीत जास्त 6kW ची पॉवर आणि 10.5Nm ची पीक टॉर्क देते. यामध्ये 3-स्टेप एडजस्टेबल रियर शॉक सस्पेंशन आहे.

TVS Jupiter 125 मध्ये सीटखाली 33 लीटर डिकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यात 2 हेल्मेट सहज बसवता येतात आणि यामुळे दोन दुचाकीस्वारांसाठी एक परफेक्ट टूव्हिलर वाटते. याशिवाय,  TVS Jupiter 125 ची एक्स-शोरूम किंमत (दिल्ली) 73,400 रुपयांपासून सुरू होते. मार्केटमध्ये TVS Jupiter 125 ही Honda Activa 125 आणि Suzuki Access 125 ला टक्कर देणार आहे.  

टॅग्स :Automobileवाहनbusinessव्यवसाय