शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नवी Tata Nexon Facelift लॉन्च! जाणून घ्या फीचर्स अन् कलर ऑप्‍शन्स; किंमतही ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 16:55 IST

इच्छुक ग्राहक केवळ 21,000 रुपयांत करू शकतात बुकिंग...!

टाटा मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित कार Tata Nexon फेसलिफ्ट भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. तिची सुरुवातीची किंमत 8.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही SUV एकूण 11 व्हेरिअंट आणि 6 रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली असून इच्छुक 21,000 रुपयांमध्ये हिची बुकिंग करू शकता. 

असं आहे डिझाईन - या एसयूव्हीच्या डिझाईनसंदर्भात बोलाये झाल्यास, ही कार नव्या लूकमध्ये सादर करण्यात आली आहे. आता हिला एक रिफ्रेश ग्रील, बम्पर, स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, एअर डॅम आणि एल-शेप एलईडी डीआरएल, हिच्या छतावर रूफ रेलसह दोन्ही बाजूंनी ब्लॅक्ड आऊट B पिलर देण्यात आले आहे. हिच्या मागच्या बाजूसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारला नव्याने डिझाइन करण्यात आलेले बम्पर, वाय शेप्ड एलईडी टेललाइट देण्यात आले आहेत. तसेच, रिव्हर्स लाइट व्हर्टीकल शेपमध्ये आहेत. यासह या कारलामध्ये लाइट बारही आहे.

केबिन फीचर्स देखील जबरदस्त -या एसयूव्हीच्या केबिन फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, यात 10.25 इंचांचे टच स्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम, इलेक्ट्रिक सनरूफ, नवे एपी पॅनल, अॅप्पल कार प्लेसह अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय या एसयूव्हीमध्ये टू-स्पोक स्टिअरिंग व्हील, नवे गियर लीव्हर, वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्ससाठी रोटरी डायलसह सेल्फ डिमिंग IRVM देखील देण्यात आला आहे.

असे असेल टाटा नेक्सन फेसलिफ्टचे इंजिन - टाटाच्या या नव्या फेसलिफ्टमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 118bhp एवढी पॉवर आणि 170Nm चा टार्क जनरेट करते. तसेच हिच्या गिअरबॉक्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, ही 5 स्पीड मॅन्यूअल, स्पीड मॅन्यूअल, AMT आणि 7 स्पीड DCT ऑप्शनसह सादर करण्यात आली आहे. 

याशिवाय, या कारला 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 113bhp एवढी पॉवर आणि 260Nm चा पीक टॉर्क देण्यास सक्षण आहे. ही कार स्पीड मॅन्यूअल युनिट आणि AMT ऑप्शनसह खरेदी केली जाऊ शकते. यांच्यासोबत असणार सामना -नवी टाटा नेक्सॉन फेसलिफ्टचा सामना आधीपासूनच बाजारात असलेल्या ह्युंदाई व्हेन्यू, किआ सोनेट, महिंद्रा एक्सयूव्ही 300 आणि मारुती सुझुकी ब्रेझा सोबत असेल. 

टॅग्स :TataटाटाAutomobile Industryवाहन उद्योगAutomobileवाहन