शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

नवीन रेंज रोव्‍हर इवोक भारतामध्‍ये सादर; किंमत ६४.१२ लाख रूपयांपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 6:17 PM

जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने आज भारतामध्‍ये नवीन रेंज रोव्‍हर इवोकच्‍या डिलिव्‍हरीजना सुरूवात केल्‍याची घोषणा केली आहे.

मुंबई : जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने आज भारतामध्‍ये नवीन रेंज रोव्‍हर इवोकच्‍या डिलिव्‍हरीजना सुरूवात केल्‍याची घोषणा केली आहे. नवीन इवोक इंजेनिअम २.० लिटर पेट्रोलवर आर-डायनॅमिक एसई ट्रिममध्‍ये, तसेच २.० लिटर डिझेल पॉवरट्रेनवर एस ट्रिमममध्‍ये उपलब्‍ध आहे. २.० लिटर पेट्रोल इंजिन १८४ केडब्‍ल्‍यू शक्‍ती व ३६५ एनएम टॉर्क देते आणि २.० लिटर डिझेल इंजिन १५० केडब्‍ल्‍यू शक्‍ती व ४३० एनएम टॉर्क देते. नवीन रेंज रोव्‍हर इवोकची किंमत भारतामध्‍ये एक्‍स-शोरूम ६४.१२ लाख रूपयांपासून सुरू होते. 

जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले, ''रेंज रोव्‍हर इवोकने अद्वितीय, आधुनिक व स्‍मार्ट डिझाइनसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवीन इंटीरिअर रंगसंगती व आधुनिक लँड रोव्‍हर तंत्रज्ञानांच्‍या सादरीकरणासह नवीन इवोकची शैली अधिक सुधारण्‍यात आली आहे आणि नवीन इंजेनिअम पॉवरट्रेन्‍सना वेईकलला अधिक शक्तिशाली व कार्यक्षम बनवतात.''  

नवीन रेंज रोव्‍हर इवोकमध्‍ये आकर्षक नवीन वैशिष्‍ट्ये आहेत- जसे ३डी सराऊंड कॅमेरा, केबिन एअर आयोनायझेशनसह पीएम२.५ फिल्‍टर, वायरलेस डिवाईस चार्जिंगसह फोन सिग्‍नल बूस्‍टर आणि नवीन पीव्‍ही प्रो इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिम. नवीन रेंज रोव्‍हर इवोकबाबत अधिक माहितीसाठी कृपया www.landrover.in या वेबसाइटला भेट द्या.    

भारतात लँड रोव्‍हर प्रोडक्‍ट पोर्टफोलिओ लँड रोव्‍हरच्‍या भारतातील रेंजमध्‍ये न्‍यू रेंज रोव्‍हर इवोक (New Range Rover Evoque) (किंमत ६४.१२ लाख रूपयांपासून), डिस्‍कव्‍हरी स्‍पोर्ट (Discovery Sport) (किंमत ६५.३० लाख रूपयांपासून), रेंज रोव्‍हर वेलार (Range Rover Velar) (किंमत ७९.८७ लाख रूपयांपासून), डिफेण्‍डर ११० (Defender 110) (किंमत ८३.३८ लाख रूपयांपासूनस), रेंज रोव्‍हर स्‍पोर्ट (Range Rover Sport) (किंमत ९१.२७ लाख रूपयांपासून) आणि रेंज रोव्‍हर (Range Rover) (किंमत २१०.८२ लाख रूपयांपासून) या कार्सचा समावेश आहे. उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या सर्व किंमती या भारतातील एक्‍स-शोरूम किंमती आहेत.  

टॅग्स :Jaguarजॅग्वार