Honda Amaze : होंडाची नवीन कार दिवाळीपूर्वी येणार, टिगोर आणि डिझायरला टक्कर देणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 04:51 PM2024-03-01T16:51:49+5:302024-03-01T16:52:41+5:30

Honda Amaze : कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये कारच्या कमतरतेसोबत अमेझचे नवीन अपडेटेड मॉडेल होंडाची विक्री वाढविण्यात मदत करू शकते. 

new honda amaze launch expected near diwali 2024 in india  | Honda Amaze : होंडाची नवीन कार दिवाळीपूर्वी येणार, टिगोर आणि डिझायरला टक्कर देणार!

Honda Amaze : होंडाची नवीन कार दिवाळीपूर्वी येणार, टिगोर आणि डिझायरला टक्कर देणार!

नवी दिल्ली : होंडा आपल्या लोकप्रिय कार अमेझचे थर्ड जनरेशन मॉडेल लाँच करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, नवीन सेडान या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये देशात लाँच केली जाऊ शकते. अमेझचे सेकंड जनरेशन मॉडेल 2018 मध्ये लाँच करण्यात आले होते. तर थर्ड जनरेशनची ही नवीन कार दिवाळीच्या आसपास बाजारात आणली जाईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये कारच्या कमतरतेसोबत अमेझचे नवीन अपडेटेड मॉडेल होंडाची विक्री वाढविण्यात मदत करू शकते. 

ज्या प्लॅटफॉर्मवर सिटी आणि एलिव्हेट तयार करण्यात आली, त्याच प्लॅटफॉर्मवर नवीन होंडा अमेझ तयार केली जाणार आहे. या प्लॅटफॉर्मनुसार, नवीन अमेझमध्ये बदल केले जातील. कारचा व्हीलबेस होंडा सिटी (2600mm) पेक्षा कमी असू शकतो. अमेझच्या सध्या विकल्या गेलेल्या मॉडेलचा व्हीलबेस 2470mm आहे, म्हणजेच तो होंडा सिटी पेक्षा 130mm कमी आहे. नवीन अमेझ देखील या व्हीलबेससह येईल.

डिझाईन
डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर नवीन जनरेशनची होंडा अमेझ स्टायलिश लूकमध्ये येईल. कारची स्टाइल होंडाच्या इतर अत्याधुनिक गाड्यांसारखीच असेल. तसेच, नवीन अमेझ सध्याच्या जनरेशनच्या होंडा एकॉर्ड सेडान प्रमाणे स्टायलिश केली जाऊ शकते, असेही म्हटले जाते.

फीचर्स
न्यू अमेझचे लेआउट आणि फीचर्स होंडा एलिव्हेटशी मिळते जुळते असू शकतात. यामध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले जाऊ शकतात. कारचे अनेक इंटिरिअर पार्ट्स नवीन होंडा सिटी आणि एलिव्हेटसारखे असतील.

सेफ्टी
नवीन होंडा अमेझमध्ये होंडाच्या सेन्सिंग टेक्नॉलॉजी पॅकेज उपलब्ध असेल, असेही काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS), लेन कीप असिस्ट, रोड डिपार्चर वॉर्निंग, लेन चेंज वॉर्निंग, ॲडव्हान्स्ड ब्रेकिंग सिस्टीम, ऑटोमॅटिक हाय बीम असिस्ट आणि ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सिस्टीम देण्यात येऊ शकते.

इंजिन
थर्ड जनरेशन अमेझला 1.2 लिटर, 4-सिलिंडर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन दिले जाऊ शकते. हा सेटअप 90bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करू शकतो. इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन दिला जाऊ शकतो.
 

Web Title: new honda amaze launch expected near diwali 2024 in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.