शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
4
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
5
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
6
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
7
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
8
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
9
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
10
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
11
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
13
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
14
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
15
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
16
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
17
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
18
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
19
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
20
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड

कोमाकीची नवीन E-Scooters, २०० किमीची रेंज, अतिरिक्त बॅटरीसह शानदार फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 14:59 IST

सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर २०० किलोमीटरपर्यंतची रेंज देईल.

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मार्केटमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. नव-नवीन इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये येत आहे. अशा परिस्थितीत एक अशी स्कूटर बाजारात आली आहे, जी तुम्हाला बजेट इलेक्ट्रिक कार इतकी रेंज देईल. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर २०० किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. विशेष म्हणजे, कंपनी स्कूटरसोबत दुसरी बॅटरी देखील देत आहे.

ही स्कूटर कोमाकी एसई ड्युअल (Komaki SE Dual) आहे. कोमाकीने आपली नवीन स्कूटर दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये मार्केटमध्ये आणली आहे. ही स्कूटर ग्राहक चारकोल ग्रे आणि सेकरेमेंटो ग्रीन कलरमध्ये खरेदी करू शकतात. स्कूटरची किंमत देखील अगदी वाजवी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर १.२८ लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे.

कंपनीने स्कूटरमध्ये पीओ ४ स्मार्ट बॅटरी वापरली आहे. ही बॅटरी अत्यंत सुरक्षित आणि अग्निरोधक आहे. स्कूटर चार्ज करण्यासाठी ४ तास लागतात. ग्राहकांना स्कूटरमध्ये ३ हजार वॅटची हब मोटर देखील मिळेल. याशिवाय, पूर्णपणे वेगळी स्टाइल देण्यासाठी एलईडी डीआरएल लाइट्स देखील देण्यात आले आहेत. तसेच, स्कूटरच्या ड्युअल बॅटरीसह, रायडर्सना २०० किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते. कंपनीचे इलेक्ट्रिक डिव्हिजनचे संचालक गुंजन मल्होत्रा ​​म्हणाले की, एसई ड्युअलसोबत आम्हाला ग्राहकांचा राइडिंग अनुभव आणखी सुधारायचा आहे.

शानदार आहेत फीचर्सया स्कूटरमध्ये ग्राहकांना एलईडी फ्रंट विंकर, ५० एम्पियर कंट्रोलर, पार्किंग असिस्ट, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट यांसारखी खास फीचर्स मिळतील. नेव्हिगेशन, साउंड सिस्टीम आणि रेडी टू राइड फीचर्ससाठी टीएफटी स्क्रीन देखील आहे. तसेच, स्कूटरमध्ये इको, स्पोर्ट आणि टर्बो असे तीन गियर मोड आहेत आणि यात ड्युअल डिस्क ब्रेक, कीफोब कीलेस एंट्री आणि कंट्रोल आणि अँटी-स्किड टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे. स्टोरेजसाठी २० लीटर बूट स्पेस देखील देण्यात आली आहे.

टॅग्स :Automobileवाहनscooterस्कूटर, मोपेडbikeबाईक