शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

प्रोजेक्टर हेडलाइटचा आगळा अविष्कार... किंमतीने महाग पण आधुनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 16:00 IST

प्रोजेक्टर हेडलाइट हा सध्याच्या काळातील एक आधुनिक तंत्राचा अविष्कार आहे. रात्रीच्यावेळी अन्य वाहनांच्या चालकांचे डोळे न दीपवता प्रखर प्रकाशझोताने रस्ता उजळवणारा हा एचआयडी पद्धतीमधील बल्ब असलेले उपकरण आहे

ठळक मुद्दे बल्बचा प्रकाश रिफ्लेक्टरवर पडून तो रिफ्लेक्टरचा प्रकाश समोरच्या भिंगामधून बाहेर पडून रस्त्यावर पडतोभिंगामधून रस्त्यावर पडलेला प्रकाश अधिक प्रखर परंतु, तो एका चौकटीच्यामध्ये पडतो, त्याच्या सीमेबाहेर तो पसरत नाहीत्यामुळे समोरच्या वाहनालाही त्याचा त्रास होत नाही

हेडलाइटविना कार काय कोणतेही रस्त्यावरचे वाहन पूर्ण होऊ शकत नाही. रात्रीच्यावेळी प्रवास करताना अतिशय गरजेचा घटक म्हणजे कारचा हेडलॅम्प. हेडलॅम्पचे आज विविध प्रकार नवनव्या तंत्रज्ञानाने अविष्कृत केलेले दिसतात. त्याचे आकार, त्याचे रूप, त्याचा विशिष्ट पद्धतीने पडणारा प्रकाश आदी सारे घटक या हेडलाइटला सातत्याने नवीनता देतद आहेत. काळानसार सतत घडणारे बदल पाहून अचंबित व्हायला होतेच पण त्याच्या किंमती पाहूनही डोळे लकलकतात. प्रोजेक्टर लाइट हा भारतातील काही निवडक कार्सना बसवण्यात येणारा प्रकार आहे.

एलईडी हा प्रकारही आता काहीसा मागे पडला आहे. प्रोजेक्टर लाइटने आपली कार ग्राहकांना अधिक आकर्षित करू शकते असा विश्वासही अनेक कंपन्यांना वाटू लागला आहे. त्यामुळेच अगदी हॅचबॅकलाही प्रोजेक्टर लाइट देत काही कंपन्यांनी त्या कारच्या वरच्या श्रेणीमध्ये ग्राहकांना या प्रोजेक्टर लाइटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा प्रोजेक्टर लाइट नेमका काय आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण एकंदर अन्य हेडलाइट्सच्या तुलनेत बाजारात आणलेला हा एक नवा प्रकार आहे.

नावाप्रमाणेच हा लाइट आहे. सिनेमाचा प्रोजेक्टर जसा तुमच्यापुढे चित्रपट भव्य स्वरूपात व विशिष्ट प्रमाणात पण प्रमाणबद्धतेने प्रकाशाच्या खेळातला चित्रपट म्हणजे फिल्मचे रूप सादर करतो, त्याचप्रमाणे या प्रोजेक्ट लाइटचे आहे. यामध्ये प्रोक्टरच्या वाटीत वा खोबणीमध्ये एक बल्ब बसवलेला असतो, त्याच्यामागे रिफ्लेक्टर असतो व तो रिफ्लेक्टर समोरच्या भिंगामधून रस्त्यावर तुम्हाला प्रकाशझोत देतो, अशी ही साधी व्याख्या आहे.यामध्ये अनेक प्रकारची भिंगे असू शकतात, त्या आधारित उपकरणेही असू शकतात.

कारच्या हेडलाइटच्या या उपकरणामध्ये क्रोम प्लेट केलेला रिफ्लेक्टर एका वाटीसारख्या खोबणीमध्ये असतो व त्याच्यामध्ये बसवलेल्या बल्बचा प्रकाश रिफ्लेक्टरवर पडून तो रिफ्लेक्टरचा प्रकाश समोरच्या भिंगामधून बाहेर पडून रस्त्यावर पडतो. त्या भिंगामधून रस्त्यावर पडलेला प्रकाश अधिक प्रखर परंतु, तो एका चौकटीच्यामध्ये पडतो, त्याच्या सीमेबाहेर तो पसरत नाही. त्यामुळे समोरच्या वाहनालाही त्याचा त्रास होत नाही. वर्तुळाकार वा चौकोनी अशा आकारात तो रस्त्यावर पडत असल्याने त्याचा प्रकाशझोत अधिक प्रखल व एकवटलेला असतो, साहजिकच त्यामुळे रस्ता अधिक प्रकाशमान होत असतो. हेच प्रोजेक्टर हेडलॅम्पचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. यामघ्ये एचआयडी प्रकारचे बल्ब वापरले जातात.

टॅग्स :carकारAutomobileवाहन