शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

२५ नव्या बदलांसह आली नवी Bajaj Pulsar 125, मायेलजही वाढलं; किंमत १०० सीसी पेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 15:31 IST

बजाजनं आपली २०२३ Pulsar 125 E20 लाँच केली आहे. नवीन इंजिन असलेल्या या मोटरसायकलमध्ये अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत.

बजाजनं आपली 2023 Pulsar 125 E20 लाँच केली आहे. नवीन इंजिन असलेल्या या मोटरसायकलला अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. ही नवी पल्सर पेट्रोलसोबत E20 इंधनावरही चालेल. दरम्यान नवीन कलर्स आणि नव्या अलॉयसह यामध्ये 25 अपडेट्स देण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या सर्व अपडेट्सनंतरही कंपनीनं त्याच्या किंमतीत मोठे बदल केलेले नाहीत. या बदलांसह, ही या विभागातील सर्वात स्वस्त बाईक आहे. त्याच वेळी, त्याची किंमत 110cc सेगमेंटच्या मोटरसायकलपेक्षाही कमी आहे. या बाईकमध्ये नवीन काय असणार आहे ते जाणून घेऊया.

2023 बजाज पल्सर 125 E20 मध्ये कंपनीनं नवीन कलर ऑप्शन्स दिले आहेत. तसेच त्यावर नवीन ग्राफिक्सही पाहायला मिळतील. विशेष बाब म्हणजे ग्रे कलरसह पिवळ्या रंगाचे ग्राफिक्स देण्यात आले आहेत यामुळे बाईकचा लूक आणखीनच चांगला दिसतो. याला मागील बाजूस 125 चं ब्रँडिंग मिळतं. फ्युअल टँकवरील पल्सरचा लोगोही बदलण्यात आला आहे. हे 3D टेक्स्टसह पिवळ्या रंगाच्या थीममध्ये उपलब्ध असेल. पेट्रोल टँकचं झाकणही सिल्व्हर रंगातून काळ्या रंगात बदलण्यात आले आहे.

अलॉय व्हिल्समध्येही बदलया बाईकमध्ये सर्वात मोठा बदल अलॉय व्हिल्समध्ये करण्यात आलाय. जुन्या मॉडेलच्या तुलनेत हे नवे आहेत. तसंच यात केवळ तीन सपोर्ट देण्यात आलेत. फ्रन्ट व्हिल्समध्ये मिळणारी डिस्क प्लेटही बदलण्यात आलीये.

लक्झरी फील मिळणारया बाईकमध्ये बजाज 150 चं मीटर मिळेल. याचाच अर्थ ही बाईक अधिक लक्झरी फिल देईल. या मीटरमध्ये IFE, ओडोमीटर, AFE, सर्व्हिसिंग, लो बॅटरीसारखी संपूर्ण माहिती मिळेल. या बाईकचा फ्युअल टँकही बदलण्यात आलाय. यामध्ये पेट्रोल टीच्या ऐवजी फ्युअल पंप देण्यात आलाय. शिवाय यात फ्युअल इंजेक्शन सिस्टम मिळेल. बाईकच्या वायरींगमध्येही बदल करण्यात आलेत.

मायलेज आणि किंमतयापूर्वीची पल्सर ही जवळपास 50 किमीपर्यंतचं मायलेज देत होती. परंतु आता यात फ्युअल इंजेक्शन सिस्टम लावण्यात आलेय. अशातच ही बाईक 55-60 किमीपर्यंतचे मायलेज देऊ शकते अशी अपेक्षा केली जात आहे. या बाईकची ऑनरोड किंमत 96 ते 97 हजारांच्या जवळ आहे. विशेष म्हणजे हीरो स्प्लेंडरमध्ये 100 सीसी इंजिन देण्यात आले असून त्याची ऑनरोड किंमत 93 हजार रूपये आहे. तर टीव्हीएस रेडरची किंमत 1.03 लाख रुपये आहे. या बाईक्सच्या तुलनेत नव्या पल्सची किंमत अतिशय कमी आहे.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकhero moto corporationहिरो मोटो कॉर्प