शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

New Audi Q5 ची बुकिंग सुरू; लवकरच लाँच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:23 IST

New Audi Q5 Bookings: ऑनलाइन बुकिंग अधिकृत वेबसाइट (www.audi.in) व ऑडी इंडिया डीलरशीपद्वारेही बुकिंग करता येईल. २०२१ वर्षातील हे ऑडीचे नववे प्रोडक्ट लाँचिंग राहणार आहे.

जर्मनीतील आलिशान कार निर्माता कंपनी ऑडीने आज भारतात आपल्या नव्या ऑडी क्यू ५ (New Audi Q5) साठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. ही कार २ लाख रुपयांत बुक करता येणार आहे. ऑनलाइन बुकिंग अधिकृत वेबसाइट (www.audi.in) व ऑडी इंडिया डीलरशीपद्वारेही बुकिंग करता येईल.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंह धिल्लन म्हणाले, “भारतातील ऑडीच्या क्यू परिवारात आम्ही आज ऑडी क्यू ५ ची भर घालत आहोत.२०२१ वर्षातील हे आमचे नववे प्रोडक्ट लाँचिंग राहणार आहे. ऑडी क्यू ५ ही आपल्या श्रेणीत अत्याधुनिक वैशिष्ट्ये, आराम आणि व्यवहार्यता यांचा परिपूर्ण संगम आहे. अगदी पहिल्याच नजरेत ऑडी क्यू ५ चे नवे डिझाइन भुरळ पाडते."

ऑडी क्यू ५ ही ४८.२६ सेंटीमीटर (आर १९) ५ डबल स्पोक स्टार स्टाइल अलॉय व्हील्स, ऑडी पार्क असिस्ट, कम्फर्ट की सेन्सर नियंत्रित बूट लिडची उघडझाप, एकमेव ऑडीतच उपलब्ध लाखेपासून निर्मित ब्लॅक पियानो इनलेज, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, बीअँडओ प्रीमियम थ्रीडी साऊंड सिस्टिम फिचर्स देण्यात आली आहेत. 

ऑडी क्यू ५ ही चारही चाकांसाठी डॅम्पिंग नियंत्रित सस्पेन्शन देण्यात आले आहे. २.० लिटरच्या शक्तिशाली टीएफएसआय इंजिन देण्यात आले आहे. तसेच त्यातील क्वॉट्रो ऑल-ड्राइव्ह यंत्रणा कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर स्थैर्यता आणते. यात सुरक्षितता वाढवण्यासाठी मागील बाजूस २ एअरबॅग्जचाही अंतर्भावासह एकूण ८ एअरबॅग्जचा समावेश करण्यात आला आहे. औरंगाबादच्या प्लाँटमध्ये या कारचे उत्पादन काही दिवसांपूर्वीच सुरु करण्यात आले आहे. ही एसयुव्ही Mercedes-Benz GLC, Land Rover Discovery Sport आणि BMW X3 यांना टक्कर देणार आहे. 

टॅग्स :Audiआॅडी