शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:55 IST

Auto Ev News: भारतातील विक्रीबाबत सांगायचे झाले तर या कंपनीच्या कार मुंबई, पुण्यासारख्या शहरात दिसत आहेत, परंतू त्या तुरळक आहेत.

जगभरात इलेक्ट्रीक वाहनांच्या मागणीत वाढ होतच आहे. परंतू, टेस्ला सारख्या कंपनीच्या मागणीत मोठी घट झाली आहे. याला राजकीय कारणे जरी असली तरी एक अशी कंपनी आहे जिने टेस्लाच्याही नाकीनऊ आणले आहेत. चीनची कंपनी बीवायडीची एक अशी कार आहे, जी जगभरातील १०० देशांत उपलब्ध करण्यात आली आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त जगाची ईव्ही जगतातील बादशहा झाली आहे. 

यामुळे सर्वच देशांच्या ऑटो कंपन्यांनी धास्ती घेतली आहे. नुकताच बीवायडी अट्टो ३ या कारने जगात १० लाख युनिट विक्रीचा टप्पा पार केला आहे. जगासाठी ही कार BYD Atto 3 असली तरी चीनमध्ये या कारचे नाव Yuan Plus असे आहे. ही कार २०२२ मध्ये पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. परंतू, तेव्हा कोरोना असल्याने जगभरात चिनी कंपन्यांना विरोध सहन करावा लागत होता. 

चीनमध्ये पहिल्या १४ महिन्यांत या कारची ३ लाख युनिट विकली गेली. यानंतरच्या सहा महिन्यांत कंपनीने आणखी दोन लाख कार विकल्या. या २० महिन्यांनंतर कंपनीने भारतासह जगभरातील १०० देशांत ही कार लाँच केली. आजची या कारची विक्री पाहिली तर जगभरात दिवसाला ही कंपनी ७१९ कार विकत आहे. तर लाँच केल्यापासूनच्या 1,391 दिवसांत कंपनीने १० लाख युनिट विकल्या आहेत. 

भारतातील विक्रीबाबत सांगायचे झाले तर या कंपनीच्या कार मुंबई, पुण्यासारख्या शहरात दिसत आहेत, परंतू त्या तुरळक आहेत. अद्याप बीवायडी भारतात पाय रोवू शकलेली नाही. २०२१ पासून ही कंपनी भारतीय बाजारात उतरली आहे. थोड्याच काळात टेस्ला देखील भारतीय बाजारात येणार आहे. याचा फटका सध्या भारतात ईव्ही सेक्टरमध्ये बादशाह असलेल्या टाटाला बसू शकतो. टाटा पाठोपाठ एमजी इंडियादेखील ईव्ही कारची चांगली विक्री करत आहे. 

टॅग्स :chinaचीनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर