शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मोटारसायकलसाठी मागील चाकापुढे साडी गार्ड लावणे गरजेचेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 14:00 IST

मोटारसायकलीच्या मागील चाकामध्ये महिलांच्या साड्या वा ओढण्या अडकू नयेत यासाठी साडीगार्ड हे मोटारसायकलीसाठी तयार केले गेलेले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्याचा प्रत्येक मोटारसायकलधारकाने नक्कीच विचार करायला हवा.

ठळक मुद्देभारतात अजून तरी अनेक ठिकाणी महिला साड्या किंवा पंजाबी ड्रेस, ओढणी याचा वापर करतातअशा प्रकारच्या वस्त्रांचा वापर करून मागे बसताना खूपच सावधाता बाळगावी लागते

भारतातील जीवनशैली ही अन्य देशांपेक्षा तशी भिन्न आहे. येते दुचाकी विशेष करून मोटारसायकल वापरण्याचे प्रमाण गेल्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे.शहरापासून ग्रामीण भागापर्यंत मोटारसायकलीचा वापर हा अगदी कौटुंबिक वाहन म्हणून होत असतो. या मोटारसायकलीवरून अनेकजण आपल्या पत्नीला, बहिणीला, मुलीला मागे बसवून नेतात.

भारतात अजून तरी अनेक ठिकाणी महिला साड्या किंवा पंजाबी ड्रेस, ओढणी याचा वापर करतात. मोटारसायकलीवरून जाताना या पद्धतीच्या वस्त्रप्रावरणाचा विचार करता साड्या वा ओढण्या चाकामध्ये अडकण्याची व दुर्घटना होण्याचीही शक्यता असते.यामुळेच मोटारसायकलीवरून जाताना अशा प्रकारच्या वस्त्रांचा वापर करून मागे बसताना खूपच सावधाता बाळगावी लागते. काहीवेळा कितीही दक्षता घेतली तरी साडीचा पदर वा ओढणी मागील चाकात अडकण्याची शक्यता असते. अनवधानाने तसे घडू शकते. खरे म्हणजे या चाकामध्ये असे काही अडकून बसू नये यासाठी मोटारसायकलीच्या डाव्या बाजूला जाळीदार ग्रीलसारखे तयार केलेले एक स्टील वा लोखंडाचे गार्ड तयार करण्यात आलेले आहे. त्याचा वापर मात्र सर्वच करतात असे नाही. कंपन्यांकडून ते पुरवण्यात येते असे नाही. अतिरिक्त साधनसामग्री म्हणून त्या गार्डकडे पाहिले जाते. 

या प्रकारचे संरक्षण देणारे हे साधे सुटसुटीत असे साधन मोटारसायकलीला लावून घेतल्याने काही फार मोठा त्रास होत नाही, दोन पैसे खर्च झाले तरी त्यामुळे संभाव्य मोठे नुकसानही टळू शकते, हे मोटारसायकल घेणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. आजकाल नव्या पिढीतील महिलांचा वेष काही प्रमाणात बदलत असला, पाश्चिमात्य पद्धतीचा पेहराव केला जात असला तरी सरसकट महिलांची वस्त्रे काही बदललेली नाहीत. अजूनही पारंपरिक अशीच आहेत. कधी कुणा पारंपरिक वस्त्र धारण केलेल्या महिलेला जर मोटारसायकलवर बसण्याची वेळ आली तर तिला ते किती त्रासदायक होऊ शकते, त्याचा विचार प्रत्येक मोटारसायकल घेणाऱ्याने करायला हवा.

विशेष करून ग्रामीण व निमशहरी भागांमध्ये तर अशा प्रकारची साडीगार्ड मोटारसायकलींना बसवून घेणे गरजेचे आहे असे वाटते. काही वेळा दुचाकी तयार करणाऱ्या या कंपन्यांनीच अतिशय गरजेच्या अशा अतिरिक्त साधनांचा वापर करून त्या दुचाकी ग्राहकांना द्यायला हव्यात. अनेकदा अतिरिक्त साधनसामग्रीची उपलब्धता ग्रामीण वा निमशहरी भागांमध्येही असत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या साधनांची आवश्यकता कंपन्यांनीही समजून ती साधने ग्राहकांना मोटारसायकल देतानाच द्यायला हवीत.

टॅग्स :AutomobileवाहनAccidentअपघात