शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

सर्वात पॉवरफुल SUV भारतात लाँच; किंमत पाहून व्हाल आश्चर्यचकित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 13:41 IST

Aston Martin DBX 707 Price and Features : ही कार  इतकी पॉवरफुल आहे की, ती केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100 च्या वेगाने धावते.

जगातील सर्वात पॉवरफुल लक्झरी SUV Aston Martin DBX 707 भारतात लाँच करण्यात आली आहे. कंपनीकडून भारतात आधीच विकल्या जाणाऱ्या Aston Martin DBX चे हे अधिक पॉवरफुल व्हर्जन आहे. ही कार  इतकी पॉवरफुल आहे की, ती केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100 च्या वेगाने धावते. याशिवाय, कारचे इंजिन 707 bhp ची अविश्वसनीय पॉवर देखील जनरेट करते. ही  Lamborghini Urus पेक्षा वेगवान आहे आणि आता तुम्ही खरेदी करू शकणारी सर्वात आलिशान सुपर एसयूव्ही आहे. जागतिक बाजारपेठेत या कारची स्पर्धा  entley Bentayga, Ferrari Purosangue आणि Lamborghini Urus यांच्यासोबत होणार आहे.

भारतात कारची किंमत 4.63 कोटी रुपये (एक्स-शोरूम, भारत) निश्चित करण्यात आली आहे. Aston Martin DBX 707 मध्ये 4.0-लिटर V8 इंजिन आहे. हे 707 Bhp आणि 900 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 9-स्पीड वेट क्लच गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही कार 3.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावते, जी Ferrari Purosangue च्या बरोबरीने आणि Lamborghini Urus पेक्षा 0.3 सेकंद वेगवान आहे. कारचा टॉप स्पीड देखील 311 किमी प्रतितास आहे.

डिझाईनच्या बाबतीत Aston Martin DBX 707 ला एक मोठा फ्रंट ग्रील आणि नवीन एअर इनटेक आणि पूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेले डीआरएल देण्यात आले आहे. Aston Martin DBX 707 ला सॉफ्ट-क्लोज डोअर देखील मिळतात. मागील बाजूस रूफ विंगसाठी नवीन लिप स्पॉयलर आहे, तर नवीन एक्झॉस्टच्या डिफ्यूझरमध्ये ग्लॉस ब्लॅक ट्रीटमेंट जोडण्यात आली आहे. स्विचगियरसाठी आतील भागात डार्क क्रोम फिनिश आहे. याशिवाय, स्पोर्ट सीट्स, समोर आणि मागील बाजूस 16-वे इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंटसह हीटिंग फंक्शन देखील उपलब्ध आहे.

टॅग्स :Automobileवाहनcarकार