शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी येतेय Maruti Jimny 5-door, बघताच प्रेमात पडला; फक्त एवढी असेल किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:56 IST

ही जिम्नी एवढी आकर्षक दिसत आहे, की आपलीही हिला ऑफ-रोडिंगवर घेऊन जाण्यची इच्छा होईल.

भारतीय कार ग्राहक 2023 मध्ये ज्या कारची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, त्यांपैकी एक म्हणजे, मारुती सुझुकी जिम्नी. सध्या परदेशातील बाजारात 3-डोअर मारुती जिम्नी विकली जाते. तर भारतात एसयूव्हीचे 5-डोअर व्हर्जन सादर होण्याच्या तयारीत आहे. मात्र, फार कमी लोकांना माहीत आहे, की जपानमध्ये 5-डोअर जिम्नी फार पूर्वीच सादर करण्यात आली होती. जपानच्या Nihon Automotive College (NATS) च्या विद्यार्थ्यांनी एक मॉडिफाय 5-डोअर Jimny दाखवली आहे.

ही जिम्नी एवढी आकर्षक दिसत आहे, की आपलीही हिला ऑफ-रोडिंगवर घेऊन जाण्यची इच्छा होईल. या मॉडिफाइड Jimny चे फोटोज nats_castomize_arita ने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय, एका व्हिडिओमध्ये आपण या Jimny ला खराब रस्त्यांवरही सहजपणे चालताना पाहू शकता. 

मॉडिफिकेशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या गाडीला MT टायरसह एक लिफ्ट किट देण्यात आली आहे. याशिवाय हिची बॉडीही थोडी उंच करण्यात आली आहे. हिला रूफ माउंटेड टेंट, ऑक्झिलरी लायटिंग, स्पेअर व्हील माउंट देखील देण्यात आले आहे. दोन्ही बाजूंना कस्टम-मेड बंपर वापरण्यात आले आहेत. याशिवाय हिला कंपनीचेच 1.5L NA पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. याच बरोबर, हिच्यात वजन आणि चंकी टायरबरोबरच चांगल्या ड्रायव्हिंग क्षमतेसाठी काही बदलही करण्यात आले आहेत.

ऑटो एक्सपोमध्ये लॉन्चिंग -भारतात मारुती सुझुकी जिम्नी 5-डोअर ऑटो एक्सपो 2023 दरम्यान सादर करण्यात येईल. हीची स्पर्धा महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा सारख्या एसयूव्हींसोबत असेल. ही कार कस्टम मेड जिम्नी सारखीच दिसू शकते. मात्र, हिला एवढ्या अॅक्सेसरीज लागलेल्या नसतील. 1.5L इंजिन या 5-डोअर जिम्नीला पॉवर देण्याचे काम करेल. हे इंजिन ऑटोमॅटिक आणि  मॅन्युअल अशा दोन्ही गिअरबॉक्ससह येते. आशा आहे की, जिम्नी 5-डोअरची किंमत 10 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होईल.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीauto expoऑटो एक्स्पो 2023Automobileवाहन