केंद्र सरकारने GST दरात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फायदा वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होत आहे. या निर्णयामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमती कमी केल्या असून, यात आता MG मोटर्स इंडियाचीही भर पडली आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय मॉडेल्स Hector, Astor आणि Gloster च्या किमतीत मोठी घट केली आहे.
MG Hector (हेक्टर) च्या 5-सीटर मॉडेलपैकी हेक्टरच्या बेस मॉडेल (Style 1.5-लीटर पेट्रोल MT) ची किंमत ₹50,000 ने कमी होऊन आता ₹14 लाख झाली आहे. सर्वाधिक बचत Sharp Pro पेट्रोल CVT मॉडेलवर असून, त्याची किंमत ₹76,000 ने कमी होऊन ₹21.31 लाख झाली आहे. डिझेल व्हर्जनमध्ये सर्वाधिक ₹1.49 लाख रुपयांची कपात झाली आहे, ज्यामुळे Sharp Pro 2.0-लीटर डिझेल MT ची किंमत आता ₹20.76 लाख झाली आहे.
6-सीटर मॉडेल: या मॉडेलवर ₹68,000 ते ₹1.45 लाख पर्यंत बचत करता येणार आहे. 7-सीटर मॉडेल: यावर ₹60,000 ते ₹1.47 लाख पर्यंत मोठी सूट मिळत आहे.
MG Astor वर ₹35,000 ते ₹54,000 पर्यंत जीएसटी कपात झाली आहे. Sprint 1.5-लीटर पेट्रोल MT मॉडेलची किंमत ₹35,000 ने कमी होऊन ₹9.65 लाख झाली आहे. Savvy Pro 1.5-लीटर पेट्रोल CVT मॉडेलवर सर्वाधिक ₹54,000 रुपयांची बचत करता येत आहे, ज्याची नवीन किंमत ₹15.16 लाख आहे.
तर MG Gloster (ग्लॉस्टर) ची किंमत Savvy 7-सीटर 4WD मॉडेलची किंमत ₹3.04 लाख ने कमी होऊन आता ₹42.49 लाख झाली आहे. Savvy 6-सीटर 4WD मॉडेलवर ₹2.62 लाख रुपयांची बचत होत असून, त्याची किंमत ₹36.59 लाख आहे.