शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Mercedes Benz नं लाँच केली Made In India कार; 55 लाखांनी स्वस्त झाली S-Class सेडानची किंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 16:37 IST

Mercedes Benz नं भारतीय बाजारपेठेत लाँच केली 'मेड-इन-इंडिया' S-Class सेडान कार.

ठळक मुद्देMercedes Benz नं भारतीय बाजारपेठेत लाँच केली 'मेड-इन-इंडिया' S-Class सेडान कार.

जर्मनीची आघाडीची लक्झरी वाहन उत्पादक Mercedes Benz नं भारतीय बाजारपेठेत आपली नवीन 'मेड-इन-इंडिया' S-Class कार लाँच केली. या सेडान कारचं उत्पादन पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या प्लांटमध्ये करण्यात आलं असून ती पूर्णपणे भारतात तयार केली करण्यात आलेली कार आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन ही या कारची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

यापूर्वी कंपनी S-Class सेडानला कम्पलिट बिल्ट युनिट (CBU) रुटद्वारे भारतात आणत होती. यामुळेच या कारची किंमत अधिक होती. त्यावेळी या कारवर अधिक इम्पोर्ट ड्युटी लावण्यात आल्यानं या कारची किंमत 2.17 कोटी रूपये इतकी होती. परंतु आता भारतात या कारचं उत्पादन होत असल्यामुळे या कारची किंमत पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. या कारची सध्या एक्स शोरूम इंडिया किंमत 1.57 कोटी रूपये इतकी आहे.

दरम्यान, भारतात एस क्लासच्या 8250 पेक्षा अधिक युनिट्सची विक्री केल्याचा दावा Mercedes Benz कडून करण्यात आला आहे. एस क्लासच्या सीबीयू युनिटला ग्राहकांची पसंती मिळाली होती. त्यामुळेच आता कंपनीनं या कारचं मेड इन इंडिया व्हर्जन लाँच केलं आहे. दरम्यान, या कारलाही आता उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा कंपनीनं व्यक्त केली आहे.

दोन व्हेरिअंटमध्ये लाँच कंपनीनं नवी S-Class दोन व्हेरिअंटमध्ये सादर केली आहे. याच्या एन्ट्री लेव्हलच्या S 350d या व्हेरिअंटची किंमत 1.57 कोटी रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर याच्या S 450 4MATIC व्हेरिअंटची किंमत 1.62 कोटी रूपये आहे. कंपनी सध्या चाकण येथील प्रकल्पात एकूण 13 कार्सचं उत्पादन करत आहे.

टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झIndiaभारत