शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:25 IST

अलास्का जवळ एका जहाजाला भीषण आग लागली आहे. या जहाजामध्ये ७५० इलेक्ट्रिक कार होत्या.

अलास्का समुद्र किनाऱ्यावर एका मोठ्या जहाजाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या जहाजामध्ये इलेक्ट्रिक गाड्या असल्याची माहिती समोर आली. मोठी दुर्घटना होता होता थोडक्यात वाचली आहे. पण, धोका अजूनही टळलेला नाही. या जहाजचे नाव मॉर्निंग मिडास असं असून ही ब्रिटीश कंपनी आहे.  यामध्ये ३,००० हून अधिक वाहने होती. त्यापैकी ७५० इलेक्ट्रिक कार होत्या. 

अलास्का कोस्टगार्डच्या माहितीनुसार, रविवारी एक आपत्कालीन कॉल आला, यामध्ये मॉर्निंग मिडास नावाच्या जहाजाला आग लागल्याची माहिती देण्यात आली. या जहाजावर २२ क्रू मेंबर्स होते. त्यांना नंतर एका खासगी जहाजाच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...

हे जहाज सध्या अलास्काच्या अडाक प्रदेशापासून सुमारे ५४७ किलोमीटर नैऋत्येस आहे. या जहाजामध्ये अजूनही आग सुरूच आहे. हे जहाज अजून बुडलेले नाही.

जहाजामध्ये इलेक्ट्रिक गाड्या

या जहाजमध्ये ७५० इलेक्ट्रिक गाड्या आहेत. यामधील अधिक गाड्यांमध्ये लिथियम-आयन बॅटरी असतात. या बॅटरी सुरक्षित मानल्या जातात, पण जर त्यांना धक्का बसला तर त्या जास्त गरम होऊ शकतात आणि आग लागू शकते.

या आगीचे कारण अजूनही पुढे आलेले नाही. पण आगीचे कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. ईव्ही वाहने  वाहून नेणाऱ्या जहाजांना अचानक आग लागली. या आगींचे कारण इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या आहेत.

अजूनही धुराचे लोट दिसत आहेत

रविवारपर्यंत आग आटोक्यात मदत करणारे अग्निशमन दल जवळपास नव्हते. बचाव पथक सोमवारी येण्याची अपेक्षा आहे. तटरक्षक दलाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये, हे ६०० फूट लांबीचे जहाजातून आग येत असल्याचे दिसत आहे.

ईव्ही बॅटऱ्यांबाबत मोठा इशारा 

ही दुर्घटना आपल्याला ईव्ही तंत्रज्ञान किती सुरक्षित आहे? याबाबत विचार करण्यास भाग पाडते. यापूर्वी लिथियम-आयन बॅटरींना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत, मग ते इलेक्ट्रिक स्कूटर असोत, कार असोत किंवा एअरलाइन्समध्ये वाहून नेली जाणारी उपकरणे असोत.

टॅग्स :AutomobileवाहनcarकारElectric Carइलेक्ट्रिक कार