शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:17 IST

Maruti's first e Vitara : मारुतीची ई-व्हिटारा ही पहिली इलेक्ट्रीक कार युकेमध्ये लाँच करण्यात आली आहे. भारतात ही कार सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रीक वाहनाची गेली कित्येक वर्षांपासून भारतीयच नाही तर जगभरातून ग्राहक वाट पाहत आहेत. अखेर मारुतीची बहुप्रतिक्षित असलेली   SUV Maruti e Vitara जागतिक बाजारात लाँच झाली आहे. या कारचे उत्पादन भारतातच केले जाणार आहे. परंतू, तिची जगासाठीची किंमत पाहून भारतीयांचे डोळे पांढरे होणार आहेत. 

मारुतीची ई-व्हिटारा ही पहिली इलेक्ट्रीक कार युकेमध्ये लाँच करण्यात आली आहे. भारतात ही कार सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. युकेमध्ये या ई व्हिटाराची किंमत £२९,९९९ ते £३७,७९९ म्हणजेच भारतीय किंमतीत ते ३५.०५ लाख ते रु. ४४.१६ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आता भारतात या कारची किंमत किती असेल हे थोड्याच महिन्यांत समजणार आहे. 

या कारमध्ये फिचर्सबाबत बोलायचे झाले तर समोर एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, वाय-आकाराचे एलईडी डीआरएल आणि पुढच्या बंपरवर जाड स्किड प्लेट देण्यात आली आहे. १८-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि बॉडी क्लॅडिंग तसेच वाय-आकाराचे एलईडी टेल-लॅम्प देण्यात आले आहेत. आतमध्ये १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, १०.१-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, इन्फिनिटी साउंड सिस्टम, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, १०-वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, फिक्स्ड ग्लास रूफ, PM2.5 केबिन एअर फिल्टर आणि अॅम्बियंट लाइटिंग आदी देण्यात आले आहेत. 

७ एअरबॅग्ज, ३६०-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स सह भारतातील ही पहिलीच मारुतीची ADAS असलेली कार असणार आहे. भारतात आता या किंमती आवाक्यात ठेवण्यासाठी काय काय कमी केले जाते, किती कॉस्ट कटिंग केले जाते, हे सप्टेंबरमध्येच समजणार आहे. 

बॅटरी...मारुती ई विटारा ४९ किलोवॅट आणि ६१ किलोवॅट अशा दोन प्रकारच्या बॅटरी देण्यात आल्या आहेत. या दोन्ही बॅटरी पॅकची रेंज अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतू ती ५०० किमीपेक्षा जास्त असेल असे सांगितले जात आहे. परंतू, भारतात मात्र या बॅटरी पॅकमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर