शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Alto नाही, तर 'ही' ठरली मारुतीची सर्वाधिक विक्री झालेली कार

By जयदीप दाभोळकर | Published: January 08, 2021 11:18 AM

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा ऑटो क्षेत्राला बसला होता फटका

ठळक मुद्देह्युंदाईची क्रेटा ठरली सर्वाधित विक्री झालेली SUVडिझेल कार्स बंद करण्याच्या मारूतीच्या निर्णायाचाही कंपनीला फटका

भारतात मारुती सुझुकीच्या गाड्या अनेकांची पहिली पसंती असते. मारुती सुझुकीची स्विफ्ट ही कार २०२० या वर्षात सर्वाधिक विक्री झालेली गाडी ठरली आहे. या गाडीनं मारुतीच्याच ऑल्टो या कारचा विक्रम मोडला आहे. गेल्या १५ वर्षांत हा विक्रम स्विफ्टच्याच सेडान मॉडेल डिझायरनं २०१८ मध्ये केला होता. परंतु २०२० मध्ये यात डिझेल मॉडेलचा पर्याय उपलब्ध नसल्यानं सर्वाधिक फटका हा डिझायरच्या विक्रीला बसल्याचं म्हटलं जात आहे. २०२० या वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख १० गाड्यांच्या वार्षिक विक्रीवर मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामध्ये केवळ किया मोटर्सची सेल्टोस ही अपवाद ठरली. ही कार ऑगस्ट २०१९ मध्येच भारतीय बाजारात दाखल झाली होती. गेल्या वर्षात ऑल्टोच्या विक्रीत २६ टक्क्यांची घट झाली असून या कालावधीत १ लाख ५४ हजार ०७४ गाड्यांची विक्री करण्यात आली. तर दुसरीकडे डिझायर आणि ब्रेझा या गाड्यांच्या विक्री अनुक्रमे ३७ आणि ३४ टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. याच्या तुलनेत स्विफ्ट आणि बलोनोच्या विक्रीत जवळपास १६.२ टक्क्यांची घट झाल्याचं समोर आलं आहे. यामुळेच प्रमुख १० गाड्यांमध्ये स्विफ्ट ही पहिल्या क्रमांकावर, ऑल्टो दुसऱ्या आणि बलोनो तिसऱ्या क्रमांकावर राहिली. एक्स-प्रेसोच्या स्पर्धेचा फटकाही ऑल्टोच्या विक्रीला बसल्याचं म्हटलं जात आहे. २०२० मध्ये एक्स-प्रेसोच्या ६७ हजार ६९० गाड्यांची विक्री झाली. क्रेटा सर्वाधिक विक्री झालेली एसयूव्हीमारुती सुझुकीची स्पर्धक कंपनी ह्युंदाईची क्रेटा ही सर्वाधिक विक्री झालेली एसयूव्ही कार ठरली आहे. या कालावधीत तब्बल ९७ हजार ह्युंदाई क्रेटाची विक्री झाली. तर टॉप १० गाड्यांच्या यादीत ही गाडी सातव्या स्थानावर होती. तर नव्यानं भारतीय बाजारपेठेत उतरलेल्या किया मोटर्सची सेल्टोस ही आठव्या क्रमांचा सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. डिझायरनंतर ह्युंदाई एलीट आय २० कारच्या विक्रीलाही मोठा फटका बसला. मारुतीनं यापूर्वी डिझेल कार्सची विक्री न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा परिणाम डिझायरसोबतच ब्रेझाच्या विक्रीवर झाला. २०२० मध्ये ही कार प्रमुख १० गाड्यांच्या यादीत १० व्या स्थानावर राहिली. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीHyundaiह्युंदाईcorona virusकोरोना वायरस बातम्याcarकारAutomobileवाहन