नवी दिल्ली : टोयोटा कंपनी पुढील काळात आपल्या कारमध्ये विविध पॉवरट्रेन ऑप्शन देण्याची योजना आखत आहे. काही वर्षांपूर्वी, टोयोटाने इंडोनेशियातील GIIAS मध्ये इनोव्हा क्रिस्टाची संपूर्ण इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट आणली होती. आता टोयोटाने बॅटरीवर चालणाऱ्या इनोव्हा क्रिस्टाची आणखी एक कॉन्सेप्ट सादर केली आहे. दुसरीकडे, मारुती इलेक्ट्रिक ऑटो मार्केटमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी तयारी करत आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्या एकत्रितपणे पुढील दोन वर्षांत ६-७ इलेक्ट्रिक वाहने मार्केटमध्ये आणू शकतात.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा इलेक्ट्रिकअपकमिंग टोयोटा इनोव्हा क्रिस्टा इलेक्ट्रिकच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, इनोव्हा क्रिस्टा इलेक्ट्रिकमध्ये ५९.३ किलोवॅट प्रति तास लिथियम आयन बॅटरी मिळू शकते. मात्र, टोयोटाने अद्याप या कारची रेंजबाबत खुलासा केला नाही. या कारमधील चार्जिंग प्लग टाइप-२ एसी आणि सीसीएस-२ डीसी चार्जरला सपोर्ट करतो. सध्या कंपनीने ही कॉन्सेप्ट प्रोडक्शनपर्यंत पोहोचेल की नाही, याची पुष्टी केलेली नाही. पण जर असे झाले तर भारतात कंपनीची ही कार लॉन्च होण्याची शक्यता आहे.
ई व्हिटारा मार्केटमध्ये खळबळ उडवणार मारुती पुढील दोन वर्षांत आपल्या ६ नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते. यामध्ये, मारुती सुझुकी ई व्हिटारा ईव्ही मार्केटमध्ये खळबळ माजवू शकते. मारुती सुझुकीच्या कार भारतात सर्वाधिक पसंत केल्या जातात. जर कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एन्ट्री करत असणार, तर ती काही मोठ्या योजनेसह येणार आहे. कंपनी २०२५-२०२६ दरम्यान ६ इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार आहे. जे इलेक्ट्रिक मार्केटमध्ये एक मोठे पाऊल ठरू शकेल.
ई व्हिटारा भारतातच तयार होणारसर्वात चांगली गोष्ट म्हणजे ई व्हिटारा भारतातच तयार केली जाणार आहे. अपकमिंग ई व्हिटारा जपान आणि युरोपसह जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. दरम्यान, मारुतीच्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. तसेच, मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत सर्वांना मागे टाकू शकते.
ई व्हिटाराची रेंज किती?मारुती ई व्हिटारा सिंगल चार्जमध्ये ५०० किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देऊ शकते. ई व्हिटारा लाँचिंगसोबत चार्जिंगशी संबंधित अनेक समस्या देखील दूर केल्या जातील. कंपनी चार्जिंग ऑप्शन्सशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी काम करणार आहे.