शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोक सर्वाधिक खरेदी करतायत Maruti च्या या 3 कार; पहिल्या कारला म्हणतात 'Tall Boy'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 17:16 IST

Best Selling Maruti Car : मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार कोणत्या? हे अनेकांना माहीत नसेल. काही लोक अल्टोला सर्वाधिक विक्री होणारी कार समजतात. तर काही वॅगनआर, स्विफ्ट आदींना.

सर्वांनाच माहीत आहे की, मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून दरवर्षी सर्वाधिक गाड्यांची विक्री करते. मात्र, मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार कोणत्या? हे अनेकांना माहीत नसेल. काही लोक अल्टोला सर्वाधिक विक्री होणारी कार समजतात. तर काही वॅगनआर, स्विफ्ट आदींना. तर जाणून घेऊयात एप्रिल महिन्‍यात मारुती सुझुकीच्‍या सर्वाधिक विकल्‍या गेलेल्या तीन कारसंदर्भात...

मारुति वॅगनआर (टॉल बॉय) -मारुती वॅगनआर ही एप्रिल 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. एप्रिल महिन्यात या कारच्या एकूण 20,879 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षातील एप्रिल महिन्याच्या तुलनेत या कारच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल (2022) महिन्यात वॅगनआरच्या एकूण 17,766 युनिट्सची विक्री झाली होती. मारुती वॅगनआरचे डिझाइन पाहता हिला 'टॉल बॉय' म्हणूनही ओळखले जाते. हिची सुरुवातीची किंमत 5.54 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. ही कार सीएनजीवर 34.05 km/kg पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती स्विफ्ट -गेल्या महिन्यात (एप्रिल 2023) मारुती स्विफ्ट दुसरी क्रमांकाची सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली. हिच्या एकूण 18,573 युनिट्सची विक्री झाली. वार्षिक आधारावर हिच्या विक्रीत 111% ची वृद्धी झाली. कारण गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये स्विफ्टच्या एकूण 8898 युनिट्सचीच विक्री झाली होती. 

मारुती बलेनो -यानंतर तिसरा क्रमांक लागतो तो मारुती सुझुकी बलेनोचा. एप्रिल 2023 मध्ये बलेनोच्या एकूण 16,180 युनिट्सची विक्री झाली. वार्षिक आधारावर हिच्या विक्रीत 48% एवढी वाढ झाली. गेल्या वर्षी अर्थात एप्रिल 2022 मध्ये हिच्या 10938 युनिटची विक्री झाली होती.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन