शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कार खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका; Maruti Suzuki एप्रिलच्या अखेरीस कारच्या किमती वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:29 IST

Maruti Suzuki to Hike Prices : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी या महिन्याच्या अखेरीस वाहनांच्या किमती वाढवणार आहे.

नवी दिल्ली :  पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीनंतर आता कारची सवारी सुद्धा तुमच्यासाठी महाग होणार आहे. देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी या महिन्याच्या अखेरीस वाहनांच्या किमती वाढवणार आहे.

खर्चात वाढ झाल्याने दरवाढीचा निर्णयकंपनीने म्हटले आहे की, इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे वाहनांच्या किमतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे किमती वाढवून त्याचा काही भाग ग्राहकांवर लादणे गरजेचे झाले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या महिन्याच्या अखेरीस किंमती वाढवण्याची योजना आहे. किमतीतील वाढ वाहनाच्या मॉडेलवर अवलंबून असेल.

वर्षभरात चार वेळा वाढले भाव मारुती सुझुकीने गेल्या एका वर्षात चार वेळा आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. कमोडिटीच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या वाहनांच्या किमती जवळपास 9 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

खर्चात वाढ झाल्यामुळे मार्जिनवर परिणामकोणत्याही कार निर्मात्यासाठी इनपुट खर्च खूप महत्त्वाचा असतो. कोणत्याही मूळ उपकरणाच्या निर्मात्यासाठी साहित्याचा खर्च हा एकूण खर्चाच्या 70 ते 75 टक्के असतो, परंतु मारुती सुझुकीसाठी तो 80.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे कंपनीच्या मार्जिनवरही परिणाम झाला आहे. त्यामुळेच मारुती सुझुकीला किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगbusinessव्यवसाय