शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात स्वस्त 7-सीटर कारनं रचला इतिहास! केला मोठा कारनामा; जाणून घ्या फीचर अन् किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 11:46 IST

कंपनीने ही कार तेरा वर्षांपूर्वी बाजारात आणली होती आणि तेव्हापासून ते आजपर्यंत, या कारने बाजारात जी पकड निर्माण केली आहे, त्याला तोड नाही.

मारुती सुझुकीची प्रसिद्ध व्हॅन मारुती ईकोने आपल्या नावावर एक नवा विक्रम नोंदवला आहे. देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी इकोने विक्रीच्या बाबतीत दहा लाख युनिट्सचा आकडा ओलांडला आहे. कंपनीने आज घोषणा केली की, ही कार 2010 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या कारचे 10 लाख युनिट्स विकले गेले आहेत. मारुती Eeco 5-सीटर आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनसह एकूण 13 व्हेरिअंटमध्ये येते. यात कार्गो, अॅम्ब्युलन्स आणि टूर व्हेरिअंटचा समावेश आहे.

महत्वाचे म्हणजे, कंपनीने मारुती सुझुकी ईको तेरा वर्षांपूर्वी बाजारात आणली होती आणि तेव्हापासून ते आजपर्यंत या कारने बाजारात जी पकड निर्माण केली आहे, त्याला तोड नाही. मारुती ईको ही तिच्या सेगमेंटमध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे. या कारचा व्यावसायिक वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. जर आकड्यावर नजर टाकली तर, मारुती Eeco चे तिच्या सेगमेंटमध्ये 94 टक्के मार्केट शेअर आहे. किफायतशीर फॅमिली कारपासून ते डिलिव्हरी व्हॅनपर्यंत, ही कार जवळजवळ प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्टीत या कारचा  वापर केला जातो.

ही कार 2010 मध्ये लॉन्च करण्यात आली. तेव्हा पहिल्या 5 युनिट्सच्या विक्रीचा आकडा पार करण्यासाठी जवळपास 8 वर्ष लागले. तसेच इतर 5 लाख युनिट्सचा आकडा कंपनीने केवळ पुढच्या 3 वर्षांतच पूर्ण केला.

कशी आहे Maruti Suzuki Eeco: मारुती सुझुकी इंडियाने स्थानिक बाजारात नुकतीच आपली प्रसिद्ध एमपीव्ही कार Maruti Eeco चे नवे अपडेटेड मॉडेल लॉन्च केले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.25 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) निश्चित करण्यात आली आहे. नव्या Maruti Eeco ला कंपनीने नवे रिफ्रेश इंटीरिअर आणि अॅडव्हान्स फीचर्स दिले आहेत. या कारला 1.2 लिटर क्षमतेचे K-Series डुअल-जेट व्हीव्हीटी पेट्रोल इंजिनचा देण्यात आले आहे. जे 80.76 PS पॉवर आणि 104.4 Nm चा टार्क जनरेट करते.

मिळतात असे फीचर्स - या शिवाय या कारमध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, नवे स्टेअरिंग व्हील, AC साठी रोटरी कंट्रोल आणि हिटर देण्यात आले आहे. जे हिच्या केबिनला अपग्रेड करतात. हिच्या पेट्रोल व्हेरिअंटमध्ये 60 लिटरचा बूट स्पेस मिळतो 

मायलेज जबरदस्त - या कारचे पेट्रोल व्हर्जन मागील मॉडेलच्या तुलनेत 25 टक्के अधिक मायलेज देईल. पेट्रोल मॉडेलवर ही कार 19.71 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देईल तर सीएनजी व्हर्जन 26.78 किलोमीटर प्रति किग्रॅ एवढे मायलेज देईल.

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन