शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Suzuki च्या 'या' कारवर 57,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट! उशीर केला तर होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 11:00 IST

Discount Offers On Maruti Suzuki Cars : ब्रँडच्या नुकत्याच लाँच झालेल्या हॅचबॅक Alto K10 वर एकूण 57,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत.

नवी दिल्ली : या नोव्हेंबर महिन्यात मारुती सुझुकी (Maruti Suzuki) निवडक मॉडेल्सवर 57,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देत आहे. या मॉडेल्समध्ये Alto K10, Celerio, S Presso, Wagon R आणि DZire यांचा समावेश आहे. यावर एक्सचेंज बोनस, कॅश डिस्काउंट आणि कॉर्पोरेट बेनिफिट्स मिळू शकतात. ब्रँडच्या नुकत्याच लाँच झालेल्या हॅचबॅक Alto K10 वर एकूण 57,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत. यामध्ये 35,000 रुपयांचे कॅश डिस्काउंट, 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफिट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. 

दुसरीकडे, Alto K10 च्या एएमटी व्हेरिएंटवर एकूण 22,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत, ज्यामध्ये 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफिट्स आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. मारुती सुझुकी S Presso मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण 56,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत, ज्यामध्ये 35,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.  S Presso च्या  एएमटी व्हेरिएंटवर एकूण 46,000 रुपयांच्या ऑफर आहेत. S Presso च्या सीएनजी व्हेरिएंटवरही एकूण 35,000 रुपयांच्या ऑफर आहेत, ज्यात 20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.

Wagon R च्या ZXi आणि ZXi+ मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण 41,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत, ज्यात 20,000 रुपयांची कॅश डिस्काउंट, 6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 15,000 रुपायांचा एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. याचबरोबर, LXi आणि VXi या दोन मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण 31,000 रुपयांच्या ऑफर आहेत. Wagon R च्या  एएमटी व्हेरिएंटवर एकूण 21,000 रुपयांच्या ऑफर उपलब्ध आहेत. याच्या सीएनजी व्हेरिएंटवर एकूण 40,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत.

मारुती सुझुकी Celerio च्या मिड-स्पेक VXI मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण 56,000 रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामध्ये  6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 35,000 रुपयांचा कॅश डिस्काउंटचा समावेश आहे. याशिवाय, Celerio च्या LXi, ZXi आणि ZXi+ मॅन्युअल व्हेरिएंटवर 41,000 रुपये आणि एएमटी व्हेरिएंटवर एकूण 21,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत. या कारच्या सीएनजी व्हेरिएंटवर एकूण 25,000 रुपयांच्या ऑफर्स आहेत.

याशिवाय, DZire च्या एएमटी व्हेरिएंटवर एकूण 32,000  रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. ज्यामध्ये 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंग बोनस मिळणार आहे. याचबरोबर, या कारच्या मॅन्युअल व्हेरिएंटवर एकूण 17,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन