शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Maruti Ertiga Cruise लाँच, स्पोर्टी लुक आणि जबरदस्त मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 17:10 IST

Maruti Ertiga Cruise : मारुतीने नवीन एर्टिगा दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केली आहे.

Maruti Ertiga Cruise नवी दिल्ली : मारुतीने आपली नवीन एर्टिगा क्रूझ (Maruti Ertiga Cruise) हायब्रीड कार लाँच केली आहे. मारुतीने या एमपीव्हीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामध्ये कंपनीने एक्सटीरिअर आणि इंटीरिअरसोबत एक पॉवरफुल बॅटरी दिली आहे. मारुतीने नवीन एर्टिगा दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केली आहे. यामध्ये पेअर व्हाइट प्लस कूल ब्लॅक ड्युअल टोन आणि इंटेन्सिफाइड कूल ब्लॅक कलर आहे.

मारुती एर्टिगा क्रूझची ही हायब्रिड आवृत्ती आहे, जी पेट्रोल आणि सीएनजी कारपेक्षा फ्यूल एफिशियंसीमध्ये स्वस्त आहे, कारण मारुतीने तिला पूर्वीपेक्षा अधिक पॉवरफुल बॅटरी दिली आहे. तसेच, तुम्हाला मारुती एर्टिगा क्रूझ हायब्रीड व्हर्जनमध्ये स्पोर्टी लुक मिळेल, ज्यामुळे या एमपीव्ही चालवण्याचा अनुभव चांगला मिळेल.

फीचर्सनवीन एर्टिगाच्या इंटीरिअरमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये या एमपीव्हीमध्ये 17.78 cm Smartplay Pro टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Arkamys साउंड सिस्टम, अँड्राईड ऑटो आणि Apple कार प्ले सिस्टम, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ॲम्बियंट लाइटिंग, पुश बटण स्टार्ट, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि 360 व्ह्यू डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर, कारच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन एर्टिगामध्ये स्पोर्टी फ्रंट बंपर, साइड अंडर स्पॉयलर, साइड बॉडी डिकल, रिअर अप्पर स्पॉयलर, स्पोर्टी रिअर बंपर विथ अंडर स्पॉयलर, 16 इंच अलॉय व्हेईकल, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि फ्रंट फॉग लॅम्प दिले आहे.

इंजिननवीन एर्टिगामध्ये माइल्ड-हायब्रिड टेक्नॉलॉजिसह 1.5 लिटर K15B पेट्रोल इंजिन आहे, जे 103ps पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, या एमपीव्हीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. नवीन एर्टिगा प्रति लीटर 20 किमी मायलेज देते.

किंमतमारुती एर्टिगा सध्या इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आली आहे. ज्याची किंमत IDR 288 मिलियन आहे. जी भारतीय चलनानुसार एक्स-शोरूम 15.3 लाख रुपये आहे. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत भारतीय रुपयांमध्ये 16 लाख रुपये आहे. दरम्यान, या वर्षाच्या अखेरपर्यंत एर्टिगा क्रूझ भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :MarutiमारुतीAutomobileवाहनcarकार