शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात स्वस्त 7 सीटर कारला लोकांची पसंती, खूप झाली विक्री, किंमत 5 लाखांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 14:16 IST

Maruti Eeco : कंपनीची स्वस्त कार सप्टेंबर 2022 मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार ठरली आहे. विशेष म्हणजे कारची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

नवी दिल्ली : कार कंपन्यांसाठी सप्टेंबर महिना चांगला राहिला आहे. बहुतांश कंपन्यांनी पॉझिटिव्ह ग्रोथ नोंदवली आहे. मारुती सुझुकीची अल्टो ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. या कारच्या 24,844 युनिट्सची विक्री झाली आहे. दुसरीकडे, मारुती ब्रेझा ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. मारुतीच्या आणखी एका कारने विक्रीचा विक्रम केला आहे. कंपनीची स्वस्त कार सप्टेंबर 2022 मध्ये देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार ठरली आहे.

विशेष म्हणजे कारची किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. दरम्यान, आपण ज्या कारबद्दल बोलत आहोत ती म्हणजे मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco). ही केवळ देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार नाही तर देशातील सर्वाधिक विकली जाणारी 7 सीटर कार देखील आहे. गेल्या महिन्यात कंपनीने या कारच्या 12,697 युनिट्सची विक्री केली आहे. तर सप्टेंबर 2021 मध्ये या कारच्या 7,844 युनिट्सची विक्री झाली. अशा प्रकारे मारुती ईकोने 61 टक्के वाढ नोंदवली आहे.

मारुती ईकोची किंमत 4.63 लाख रुपयांपासून सुरू होते आणि एक्स-शोरूम 5.94 लाख रुपयांपर्यंत जाते.  या कारची लांबी 3,675 मिमी, रुंदी 1,475 मिमी आणि उंची 1,800 मिमी आहे. व्हीलबेसबद्दल बोलायचे तर ते 2,350 मिमी आहे. मारुती ईकोमध्ये ड्युअल टोन इंटीरियरसह चांगला एसी, आलिशान केबिन स्पेस, मागील पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सिस्टम आणि सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

पेट्रोल व्हेरिएंट 16.11kmpl मायलेजमारुती इको वाहन पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये 1.2-लिटर न्यॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 73PS पॉवर आणि 98Nm टॉर्क निर्माण करते. तसेच, कारचे CNG किट असलेले इंजिन 63PS पॉवर आणि 85Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीचा दावा आहे की,  पेट्रोल व्हेरिएंट 16.11kmpl मायलेज देते आणि CNG व्हेरिएंट 20.88kmpl मायलेज देते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहनcarकार