शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Video: तुमची Maruti Dzire ईलेक्ट्रीकमध्ये कन्व्हर्ट करता येणार; वेगात नेक्सॉन ईव्हीलाही मागे टाकणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 11:34 IST

Maruti Dzire electric car conversion kit:  प्रत्येक कारसाठी एकसारखेच किट बसेलच असे नाही. कारचा प्लॅटफॉर्म, वजन आणि अन्य भागदेखील खूप महत्वाचे असतात. यामुळे प्रत्येक प्रकारच्या कारसाठी मुळापासून सुरुवात करावी लागते. डिझायरसाठी Northway Motorsport ने मोटर, कंट्रोलर आणि अन्य भाग बनविले आहेत. पहा या डिझायरची रेंज, चार्जिंग आदी फिचर्सबाबत.

Maruti Suzuki Dzire EV: देशात हळूहळू इलेक्ट्रीक कारची मागणी वाढू लागली आहे. जगभरातही जास्त रेंजच्या कार लाँच होत आहेत. भारतात मात्र ही रेंज काहीशी कमी आहे. परंतू पुढील काही वर्षांत हे तंत्रज्ञान विकसित होणार आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी वॅगन आरच्या ईलेक्ट्रीक व्हेरिअंटवर काम करत आहे. मात्र, मारुती सुझुकीच्याच डिझायरचे (Maruti Suzuki Dzire) ईलेक्ट्रीक व्हर्जन तयारही झाले आहे. होय, Northway Motorsport ने डिझायरमध्ये बदल करून ती ईव्हीमध्ये कन्व्हर्ट करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी विकसित केलेले किट वापरले आहे. चला जाणून घेऊया या ईव्ही बद्दल... (Northway Motorsport who has converted a Maruti Suzuki Dzire compact sedan into a fully electric car using their own kit)

Maruti Suzuki: मारुतीचा ग्राहकांना झटका; Swift सह CNG कारच्या किंमती वाढविल्या, जाणून घ्या...

प्रत्येक कारसाठी एकसारखेच किट बसेलच असे नाही. कारचा प्लॅटफॉर्म, वजन आणि अन्य भागदेखील खूप महत्वाचे असतात. यामुळे प्रत्येक प्रकारच्या कारसाठी मुळापासून सुरुवात करावी लागते. डिझायरसाठी Northway Motorsport ने मोटर, कंट्रोलर आणि अन्य भाग बनविले आहेत. महत्वाची बाब म्हणजे ईव्हीमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर या कारचे सस्पेन्शन किंवा टायर बदलण्याची गरज राहणार नाही. यामुळे हा पर्याय एक स्वस्त पर्या ठरू शकतो. कंपनीने अनेक पार्ट हे पेटंटसाठी पाठविल्याने त्यावर जास्त माहिती दिलेली नाही. परंतू जी दिलीय ती मोठा दिलासा देणारी आहे. कारण ही कार टाटाची लोकप्रिय कार नेक्सॉन ईव्हीला टक्कर देणारी आहे. 

वेग वाढला... (Maruti Suzuki Dzire EV Range)मारुती डिझायरची पेट्रोल व्हर्जनची कार 0 ते 100 किमीचा वेग 12 सेकंदात गाठते. मात्र, ईव्ही १० सेकंदात. ईव्हीचे इंजिन सेटअप हा नेक्सॉनच्या सेटअपपेक्षा छोटा आहे. मात्र, टॉप स्पीड हा 160 किमी प्रति तास आहे. तर नेक्सॉन ईव्हीचा टॉप स्पीड 120 किमी प्रति तास आहे. या रेसमध्ये ही डिझायर टाटा नेक्सॉन ईव्हीला (nexon EV) मागे टाकते. 

CNG Car: मारुतीच्या ताफ्यात आणखी एक CNG कार येणार; डिझायर टेस्टिंगवेळी स्पॉट

रेंज किती.... (Maruti Suzuki Dzire EV charging)बॅटरीची रेंज ही बॅटरी पॅकवर अवनलंबून आहे. 20 KwH ची बॅटरी डिझायरला 240 किमीची रेंज देते. नेक्स़ॉन मात्र इथे उजवी ठरते. फास्ट चार्जिंग आणि इनबिल्ट चार्जर देण्यात येतो. सामान्य चार्जरने पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तास लागतात तर फास्ट चार्जरने ही कार एका तासाच्या आत चार्ज होते. 

बॅटरी ही कारच्या आतमध्ये किंवा बॉनेटमध्ये ठेवता येत असल्याने डिक्की वाया जात नाही. जे किट या डिझायरमध्ये वापरण्यात आले आहे, ते टेस्टिंगसाठी मान्यता मिळविलेले आहे. व्यापारासाठी अद्याप मान्यता मिळायची आहे.  

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारMarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीTataटाटा