शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

Maruti Brezza CNG Price : मारुती ब्रेझा सीएनजी लाँच, जाणून घ्या मायलेज आणि किंमत....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 18:16 IST

Maruti Brezza CNG Price : ब्रेझा सीएनजीची डिझाइन पेट्रोल मॉडेलप्रमाणेच आहे. याशिवाय, नवीन ब्रेझा सीएनजीला ग्रँड विटारा, एर्टिगा आणि मारुती XL6 सारखे इंजिन ऑप्शन मिळतात.

नवी दिल्ली : मारुती ब्रेझा सीएनजी (Maruti Brezza CNG) भारतात लाँच झाली आहे. ही सीएनजी एसयूव्ही कंपनीने 2023 ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली होती. ही नवीन सीएनजी कार एकूण 4 व्हेरिएंटमध्ये खरेदी केली जाऊ शकते. ज्यामध्ये LXi, VXi, ZXi आणि ZXi ड्युअल टोनचा समावेश आहे. हे मारुती सुझुकीच्या ARENA डीलरशिपद्वारे विकले जाईल. ब्रेझा सीएनजीची डिझाइन पेट्रोल मॉडेलप्रमाणेच आहे. याशिवाय, नवीन ब्रेझा सीएनजीला ग्रँड विटारा, एर्टिगा आणि मारुती XL6 सारखे इंजिन ऑप्शन मिळतात.

फीचर्सकार पेट्रोल आणि सीएनजी फ्यूल लिड, सीएनजी ड्राइव्ह मोड, डिजिटल-अॅनालॉग फ्यूल गेज आणि फ्यूल चेंज स्विच यांसारख्या फीचर्ससह येते. याशिवाय, कारमध्ये 9-इंचाचा स्मार्टप्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले, कीलेस पुश स्टार्ट आणि क्रूझ कंट्रोल आहे.

इंजिनया एसयूव्हीमध्ये 1.5-लिटर K15C ड्युअल-जेट पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी किटचा सपोर्ट आहे. सीएनजी मोडमध्ये कारचे इंजिन 87.8 PS ची पॉवर आणि 121.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तर पेट्रोल मोडमध्ये कारचे इंजिन 100.6PS आणि 136Nm आउटपुट मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार, कार 25.51km/kg पर्यंत मायलेज देऊ शकते.

किंमतमारुती ब्रेझा सीएनजीची सुरुवातीची किंमत 9.14 लाख रुपये आहे, जी 12.06 लाख रुपयांपर्यंत जाते. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत. ब्रेझा सीएनजीची भारतीय बाजारपेठेत टाटा नेक्सॉन सीएनजीशी स्पर्धा होईल, जी येत्या काही दिवसांत लॉन्च केली जाणार आहे. दरम्यान, ब्रेझा सीएनजी हे मारुतीचे 14 वे प्रोडक्ट आहे, जे फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह येते. यासह, आता ARENA डीलरशिप नेटवर्कमध्ये विकल्या जाणार्‍या सर्व कारमध्ये सीएनजी ऑप्शन मिळेल.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार