शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:28 IST

citroen aircross x pre bookings open look teaserl

सिट्रोएन इंडियाने त्यांच्या अपडेटेड एअरक्रॉस X SUV (SUV Aircross X) ची प्री-बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक केवळ ११,००० रुपयांच्या टोकनसह हिची बुकिंग करू शकतात. ही कार पुढच्याच महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता असून, या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि नवीन डिझाइन्स देण्यात आले आहेत. यांपैकी काही बेसाल्ट एक्समधून घेण्यात आले आहे. जाणून घेऊयात हिची खासियत.

नवा कलर आणि एक्सटीरिअर अपडेट्स - सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या टीझर इमेजवरून, एअरक्रॉस एक्समध्ये एक नवीन हिरव्या रंगाचा पर्याय उपलब्ध असेल, असे वाटते. याशिवाय, टेलगेटवर एक नवीन 'एक्स' बॅजिंग दिसेल. उर्वरित डिझाइनमध्ये कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत.

केबिन आणि फीचर्स अपग्रेड - इंटीरिअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, या SUV चे केबिन आणखी प्रीमियम बनवण्यात आले आहे. यात नवे लेदर-रॅप्ड डॅशबोर्ड, सॉफ्ट-टच मटेरियल, ड्युअल-टोन थीम, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, व्हाइट अँबियंट लाइटिंग, LED फॉग लैंप, ऑटो-डिमिंग IRVM, लेदरेट अपहोल्स्ट्री आणि ऑप्शनल 360-डिग्री कॅमेरा असेल.

AI असिस्टंन्ट -सिट्रोएन एअरक्रॉस X मध्ये Citroen चा नवीन CARA इन-कार AI असिस्टंट देखील मिळेल. जो 52 भाषांमध्ये व्हॉइस कमांड समजू शकतो. तसेच, बेस्ट नेव्हिगेशन रूट, जवळचा इंधन पंप, डेस्टिनेशनपर्यंत डिस्टंन्स टू एम्प्टीसारखी माहितीही देईल, जी अत्यंत अॅडव्हान्स्ड आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स -यात कसल्याही प्रकारचे मॅकेनिकल बदल अपेक्षित नाहीत. या कारमध्येही 1.2L नॅच्युरली-अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (81 bhp, 5-स्पीड गिअरबॉक्स) आणि 1.2L टर्बो-पेट्रोल इंजिन (108 bhp, 6-स्पीड मॅनुअल/टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक) ऑप्शन मिळेल.

टॅग्स :Automobileवाहनcarकार