Mahindra चा आणखी एक धमाका, Fortuner ला टक्कर देण्यासाठी नवीन स्वस्त SUV लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 12:25 PM2023-02-09T12:25:52+5:302023-02-09T12:26:32+5:30

Mahindra Scorpio-N : या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 21.95 लाख रुपये आहे.

mahindra scorpio n launch in south africa market toyota fortuner rival | Mahindra चा आणखी एक धमाका, Fortuner ला टक्कर देण्यासाठी नवीन स्वस्त SUV लाँच

Mahindra चा आणखी एक धमाका, Fortuner ला टक्कर देण्यासाठी नवीन स्वस्त SUV लाँच

googlenewsNext

नवी दिल्ली : महिंद्राने अधिकृतपणे स्कॉर्पिओ-एन (Scorpio-N) दक्षिण आफ्रिकेच्या बाजारात लाँच केली आहे. स्कॉर्पिओ-एन ही एसयूव्ही Z4, Z8 आणि Z8L या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. एसयूव्ही केवळ 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 2.2-लिटर डिझेल इंजिनसह लाँच करण्यात आली आहे. म्हणजेच, दक्षिण आफ्रिकन स्कॉर्पिओ-एनला फक्त एक इंजिन ऑप्शन आणि एक ट्रान्समिशन ऑप्शन मिळेल तर त्याचे भारतीय मॉडेल देखील पेट्रोल इंजिन ऑप्शनसह येते आणि मॅन्युअल ट्रान्समिशन देखील उपलब्ध आहे. या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 21.95 लाख रुपये आहे.

दक्षिण आफ्रिकेत लाँच करण्यात आलेली महिंद्रा स्कॉर्पिओ-एन 2.2-लिटर, चार-सिलिंडर, mHawk डिझेल इंजिन आहे, जे 172bhp पॉवर आणि 400Nm टॉर्क जनरेट करण्यासाठी ट्यून केलेले आहे. हे 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमेटिक ट्रांसमिशनसह जोडलेले आहे. यामध्ये स्टँडर्ड म्हणून RWD सेटअप मिळते. तर ग्राहकांना 4x4 व्हर्जनचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बाजारात एसयूव्ही फक्त 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आली आहे.

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एसयूव्हीमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, ड्युअल बॅरल हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाइट, 18-इंच डायमंड-कट अलॉय व्हील, ड्राइव्ह मोड (झिप, झॅप आणि झूम), ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस. चार्जिंग, कूल्ड ग्लव्ह-बॉक्स, 12-स्पीकर सोनी-सोर्स्ड म्युझिक सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्टसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

या व्यतिरिक्त, एसयूव्हीमध्ये इतर अनेक फीचर्स देखील आहेत. यात ड्युअल-टोन इंटीरियर थीम, अॅड्रेनोएक्स कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, 6 एअरबॅग्ज आणि टीपीएमएस सारखी फीचर्स देखील मिळतात. एसयूव्हीमध्ये डॅझलिंग सिल्व्हर, डीप फॉरेस्ट, ग्रँड कॅन्यन, एव्हरेस्ट व्हाइट, नेपोली ब्लॅक आणि रेड रेज कलर ऑप्शन आहेत. दरम्यान, आपल्या माहितीसाठी स्कार्पिओ-एन एसयूव्हीची भारतीय बाजारपेठेत टोयोटा फॉर्च्युनरसोबत टक्कर सुरू आहे. पण या एसयूव्हीची किंमत फॉर्च्युनरपेक्षा खूपच कमी आहे.

Web Title: mahindra scorpio n launch in south africa market toyota fortuner rival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.