महिंद्रा आपली लोकप्रिय SUV थार 3-डोर नव्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या थारच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून इंटीरियर अधिक प्रीमियम बनवण्यात आले आहे. कंपनीने नुकत्याच लॉन्च झालेल्या Thar Roxx 5-डोर मधील काही अॅडव्हान्स फीचर्स देखील 3-डोर व्हर्जनमध्ये समाविष्ट केले आहेत.
डिझाइनमध्ये बदल -फेसलिफ्ट थार 3-डोरचे बाह्य स्वरूप आधीच्या तुलनेत अधिक फ्रेश आणि मॉडर्न दिसेल. यात नवे बंपर, नवीन ग्रिल, अपडेटेड हेडलॅम्प्स आणि अलॉय व्हील्स असतील. या बदलांमुळे ही SUV अधिक आकर्षक दिसेल, मात्र तिची ऑफ-रोडिंग ओळख काय ठेवली जाईल.
इंटीरियर होणार अधिक प्रीमियम -या नव्या थारच्या इंटीरियरमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यात Roxx प्रमाणे नवे स्टीयरिंग व्हील आणि सेंटर कन्सोल मिळेल. पावर विंडो स्विच आता दारांवर असतील. याशिवाय मोठे इन्फोटेनमेंट स्क्रीनही देण्यात येणार असून नवीन कम्फर्ट फीचर्स आणि तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल. सुधारित सीट्समुळे प्रवास अधिक आरामदायी होईल.
इंजिन आणि परफॉर्मन्सया थारच्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये इंजिन पर्यायांमध्ये कोणताही बदल होणार नाही. यात पूर्वीप्रमाणेच 1.5-लिटर डिझेल (RWD), 2.0-लिटर पेट्रोल आणि 2.2-लिटर डिझेल इंजिन मिळेल. SUV मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल. महत्वाचे म्हणजे, 4x4 व्हेरिएंटदेखील ग्राहकांसाठी सुरूच राहतील.
किती असेल किंमत? -नव्या फेसलिफ्ट थार 3-डोरच्या किंमतीचा विचार करता, ती सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक असू शकते. कंपनी, Thar Roxx आणि विद्यमान 3-डोर थार, यांच्या किंमतीतील संतुलन साधत नवी थार बाजारात आणणार आहे. या नव्या फेसलिफ्ट थारमुळे ब्रँडच्या विक्रीत वाढ होईल, अशा आशा कंपनीला आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती आणि किंमत लवकरच जाहीर केली जाईल.