शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Honda Cityची पेट्रोल आवृत्तीतील BS6 रुपातील नवी गाडी लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 10:06 PM

होंडा कार्स इंडिया लिमिटेड(HCIL)नं Honda Cityची पेट्रोल आवृत्तीतील BS6 रुपातील नवी गाडी लाँच केली आहे.

नवी दिल्लीः होंडा कार्स इंडिया लिमिटेड(HCIL)नं Honda Cityची पेट्रोल आवृत्तीतील BS6 रुपातील नवी गाडी लाँच केली आहे. सेडान प्रकारातील BS6 इंजिनच्या या होंडा सिटीच्या पेट्रोल आवृत्तीतील गाडीची किंमत 9.91 लाखांपासून 14.31 लाख रुपयांपर्यंत आहे. BS6 इंजिनयुक्त असलेल्या होंडा सिटीच्या पेट्रोल आवृत्तीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. होंडा सिटीचं लवकरच अपग्रेडेड डिझेल व्हेरियंट लाँच करण्यात येणार आहे. मिड-साइज सेडान प्रकारात BS6च्या इंजिनाबरोबर बाजारात आलेली होंडा सिटी ही पहिली कार ठरली आहे. नव्या होंडा सिटीमध्ये 1.5 लीटर, 4 सिलिंडर, वॉटर कूल्ड, SOHC, i-VTEC पेट्रोल इंजिन देण्यात आलेलं आहे. या इंजिनमुळे 119 PSची पॉवर आणि 145Nm टॉर्क निर्माण होणार आहे. तसेच या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सची व्यवस्थाही आहे. नव्या होंडा सिटीमध्ये आपल्याला CVT पर्यायही मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार मॅन्युअल प्रकारात ही गाडी 17.4 किलोमीटर प्रतिलिटर सरासरी अंतर कापणार आहे. होंडा सिटीनं BS6 प्रकारातील गाडी बाजारात आणल्यानं कंपनीच्या आता या आवृत्तीतील तीन गाड्या झाल्या आहेत. होंडा CR-V पेट्रोल, होंडा सिव्हिक पेट्रोल आणि Honda Cityची BS6 इंजिनही गाडीही आता बाजारात आहे. भारतात नव्या होंडा सिटीची प्रतिस्पर्धा मारुती सुझुकी सियाज, ह्युंदाई वर्ना, फॉक्सवेगन वेंटो आणि स्कोडा रॅपिडसारख्या गाड्यांबरोबर आहे. कंपनीनं नव्या होंडा सिटीत V, VX आणि ZX प्रकारात अद्ययावत इन्फोटेन्मेंट सिस्टम Digipad 2.0सुद्धा दिलेलं आहे. ज्यात 17.7cm अत्याधुनिक टचस्क्रीन ऑडिओ, व्हिडीओ आणि नेव्हिगेशन सिस्टम आहे. ऍपल कार प्ले आणि ऍड्रॉइड ऑटोच्या माध्यमातून स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसुद्धा दिलेली आहे. तसेच इन-बिल्ट सेटलाइट-लिंक्ड, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, USB वाय-फाय रिसिव्हरच्या माध्यमातून लाइव्ह ट्रॅफिक सपोर्ट, वॉयस कमांडसारखे फीचर्स देण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Hondaहोंडा