शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Kinetic Luna Electric: 1972 ची लोकप्रिय मोपेड कायनेटिक लुना इलेक्ट्रिक अवतारात पुन्हा येणार, ऑटो एक्सपोमध्ये दिसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:58 IST

Kinetic Luna Electric: कंपनी हे मोपेड पेट्रोल इंजिनऐवजी इलेक्ट्रिक अवतारमध्ये लॉन्च करणार आहे. ज्याला कायनेटिक ई-लुना (Kinetic e-Luna) असे नाव दिले जाऊ शकते.

नवी दिल्ली :  कायनेटिक ग्रुप (Kinetic Group ) लवकरच भारतीय बाजारपेठेत आपले लोकप्रिय मोपेड कायनेटिक लुना (Luna Electric) पुन्हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र, यादरम्यान कंपनी हे मोपेड पेट्रोल इंजिनऐवजी इलेक्ट्रिक अवतारमध्ये लॉन्च करणार आहे. ज्याला कायनेटिक ई-लुना (Kinetic e-Luna) असे नाव दिले जाऊ शकते.

रिपोर्टनुसार, कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेडने (KEL)  लुना इलेक्ट्रिकचे उत्पादन सुरू केले आहे, ज्यामध्ये त्याच्या चेसिस आणि इतर भागांचे उत्पादन देखील सुरू झाले आहे. याशिवाय, कायनेटिक ई-लुनाचे मेन चेसिस, डबल स्टँड, साइड स्टँड आणि हँडलबारसह अनेक महत्त्वाचे भाग कायनेटिकच्या उपविभागाद्वारे तयार केले जात आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे उद्दिष्ट दर महिन्याला 5,000 इलेक्ट्रिक लुनाचे उत्पादन करण्याचे आहे.

इलेक्ट्रिक लूनाबाबत कंपनीच्या नियोजनाविषयी बोलताना कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड (केईएल) चे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया म्हणाले, "आम्ही आगामी 2-3 वर्षांत हा व्यवसाय वार्षिक 30 कोटी रुपयांनी वाढण्याची अपेक्षा करतो आणि याचे कारण इलेक्ट्रिक लुनाच्या संख्येत वाढ झाली आहे. या इलेक्ट्रिक लुनाच्या माध्यमातून कंपनीला इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये आपली मजबूत उपस्थिती नोंदवण्यास मदत मिळेल."

याचबरोबर, अजिंक्य फिरोदिया यांनी पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या लुनाच्या विक्रीबद्दल सांगितले की, आपल्या काळात कंपनी सर्वाधिक लुना विकत असे, जे दररोज 2 हजार युनिट्सपेक्षा जास्त होते. आम्हाला खात्री आहे की ई-लुना आपल्या इलेक्ट्रिक अवतारात आणखी चांगली कामगिरी करेल.

Kinetic Group ने कधी आणली होती लुना दुचाकीकायनेटिक ग्रुपने 1972 मध्ये लॉन्च केलेली, लुना ही भारतातील सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक मागणी असलेली दुचाकी बनली. पण 2000 मध्ये तब्बल 28 वर्षांनंतर कंपनीने कायनेटिक लुनाचे उत्पादन बंद केले होते. त्यावेळी कंपनीने या मोपेडमध्ये 50 सीसीचे इंजिन दिले होते.

Kinetic E Luna कधी होणार लॉन्च?या ई-लुनाच्या लाँचिंगपासून ते राइडिंग रेंज, बॅटरी पॅक, टॉप स्पीड, फीचर्स आणि किमतीबाबत कायनेटिक ग्रुपने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी 2023 ऑटो एक्सपोमध्ये इलेक्ट्रिक लुनाचे सॅम्पल मॉडेल सादर करू शकते.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर