शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुढील महिन्यात 'या' कारचे फेसलिफ्ट मॉडेल येणार, जाणून घ्या सविस्तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 14:51 IST

2023 Kia Seltos Facelift : चार वर्षांनंतर आता कंपनी या कारचे फेसलिफ्ट मॉडेल अपडेटेड डिझाइन आणि नवीन फीचर्ससह लाँच करण्याच्या तयारीत आहे.

किआ इंडियाने (Kia India) 2019 मध्ये सेल्टोस लाँच केली होती. सेल्टोस लाँच झाल्यापासून किआचे सर्वाधिक विक्री होणारे ही कार ठरली आहे. चार वर्षांनंतर आता कंपनी या कारचे फेसलिफ्ट मॉडेल अपडेटेड डिझाइन आणि नवीन फीचर्ससह लाँच करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान,  Kia Seltos Facelift मॉडेल टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा स्पॉट करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी पुढील महिन्यात 4 जुलै रोजी आपल्या कारचे अनावरण करेल, तर ऑगस्टमध्ये ही कार लाँच करण्याची योजना आहे. पुढील महिन्यात या कारचे अनावरण झाल्यानंतर कंपनी आपल्या कारचे बुकिंग सुरू करेल, अशी शक्यता आहे.

किआने गेल्या वर्षी या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन दक्षिण कोरियामध्ये लाँच केले होते. त्यामुळे ही कार भारतातही अशाच बदलांसह लाँच केली जाऊ शकते. या कारच्या पुढील आणि मागील डिझाइनमध्ये बदल पाहायला मिळतील अशी अशी शक्यता आहे.

कारच्या पुढील बाजूस नवीन मॅश पॅटर्नसह एक मोठी ग्रिल पाहायला मिळेल. कारच्या बाजूंना कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. या कारमध्ये 18 इंची अलॉय व्हील्स उपलब्ध असतील. मागील बाजूस मोठे एलईडी टेललॅम्पही दिले जातील.

फीचर्सभारतात लाँच होणाऱ्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये ट्विन स्क्रीन सेटअप पाहायला मिळेल. प्रत्येक स्क्रीनचा आकार 10.25 इंचापर्यंत असू शकतो. ADAS फीचर आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारखे फीचर्सही या कारमध्ये पाहायला मिळतात.

इंजिनया कारमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच पेट्रोल आणि टर्बो डिझेल इंजिन पाहायला मिळू शकते. याशिवाय कंपनी नवीन 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील लाँच करू शकते. ही कार 6 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटो क्लच मॅन्युअल ट्रान्समिशनसह लाँच होते की नाही, हे पाहण्यासारखे आहे.

टॅग्स :AutomobileवाहनKia Motars Carsकिया मोटर्स