शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

सिंगल चार्जवर 600 KM ची रेंज, भारतात कधी लॉन्च होणार KIA ची नवीन EV कार? पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 19:05 IST

Kia New Electric Car: फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 31 मिनिटांत बॅटरी चार्ज होणार.

Kia Electric Cars: काही वर्षांपूर्वी भारतात व्यवसाय सुरू करणाऱ्या Kia मोटर्सने आपला चांगला जम बसवला आहे. कंपनी सातत्याने आपल्या नव नवीन गाड्या लॉन्च करत आहे. आता कंपनीने आपल्या EV पोर्टफोलिओमध्ये आणखी एक गाडी आणली आहे. कंपनीने या नवीन EV3 चा टीझरदेखील जारी केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी कंपनीने EV9, EV6 आणि EV5 मॉडेल्सदेखील जागतिक बाजारात आणले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, E-GMP मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार केलेली ही कार सिंगल चार्जवर 600 किमीची रेंज देईल. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार कोरियन बाजारात जुलै 2024 पर्यंत लॉन्च केली जाईल. यानंतर युरोप आणि पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत लॉन्च होईल. या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 30 लाख रुपये असू शकते.

जाणून घ्या फीचर्स...कंपनीने EV3 मध्ये हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे. ही मोटर 201 bhp पॉवर आणि 283 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही इतकी शक्तिशाली आहे की, अवघ्या 7.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. कारचा टॉप स्पीड 180 किमी प्रतितास आहे. EV3 जागतिक बाजारपेठेत 58.3kWh आणि 81.4kWh या दोन बॅटरी पॅकसह लॉन्च केली जाईल. मोठी बॅटरी 600 किमीची श्रेणी देईल अन् DC फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 31 मिनिटांत 80% पर्यंत बॅटरी चार्ज करू शकाल.

सुरक्षा फीचर्स Kia EV3 च्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाल्यास, यात फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स, लेन-कीप असिस्ट आणि मल्टिपल एअरबॅग्स, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि लेव्हल 2 ॲडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) यांसारखी फीचर्स मिळतील. तसेच, ही कार व्हॉईस कमांडने चालू शकेल. ही कार भारतात लॉन्च झाल्यावर याची BYD Ato-3, मारुती EVX, MG ZS EV, Hyundai Creta EV आणि Tata Curve EV शी स्पर्धा करेल.

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार