Kia India ची अफलातून ऑफर; कार आवडली नाही तर 30 दिवसांत परत करा....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 06:09 PM2021-05-26T18:09:14+5:302021-05-26T18:11:14+5:30

Kia Carnival MPV offer: किया इंडिया कंपनीने सॅटिस्फॅक्शन गॅरंटी स्कीम जाहीर केली आहे. कोणत्याही कारणाने तुम्ही कार परत करू इच्छित असाल तर ती परत करू शकता.

Kia India's awesome offer; If you don't like the car Kia Carnival MPV, return it in 30 days .... | Kia India ची अफलातून ऑफर; कार आवडली नाही तर 30 दिवसांत परत करा....

Kia India ची अफलातून ऑफर; कार आवडली नाही तर 30 दिवसांत परत करा....

Next

Kia India ने आज एक नवीन स्कीम सुरु केली आहे. याला कंपनीने सॅटिस्फॅक्शन गॅरंटी स्कीमनुसार जर कोणताही ग्राहक कियाची लक्झरी Carnival MPV खरेदी करत असेल तर त्यांना जबरदस्त ऑफर मिळणार आहे. कार पसंतीस उतरली नाही तर ३० दिवसांत कंपनीला परत करता येणार आहे. (Kia Carnival offered with 30 day return scheme)


सॅटिस्फॅक्शन गॅरंटी स्कीमनुसार जर तुम्ही कियाची लक्झरी कार किया कार्निव्हल खरेदी केली आणि जर तुम्हाला ही कार आवडली नाही किंवा कोणत्याही कारणाने तुम्ही ही कार परत करू इच्छित असाल तर ती परत करू शकता. यासाठी कंपनी तुम्हाला 30 दिवसांचा कालावधी देणार आहे. 
या ऑफरमध्ये एक अट आहे, ती म्हणजे ही एमपीव्ही खरेदी केल्यानंतर ती जर परत केली तर तिची 95 टक्के एक्स शोरुम किंमत तुम्हाला परत मिळणार आहे. याचसोबत रजिस्ट्रेशन आणि फायनान्सलसाठी आलेला खर्चही परत दिला जाणार आहे. या 30 दिवसांत कार 1500 किमी पेक्षा जास्त चाललेली असता नये. 

Kia SUV Fire: पार्किंगमध्ये उभ्या KIA च्या कारना आग लागण्याचा धोका; 4.4 लाख कार रिकॉल केल्या


Carnival MPV मध्ये व्हीआयपी सीट्स विथ एन्टरटेन्मेंट, वन टच पॉवर स्लायडिंग डोअर, पॉवर टेलगेट अशी भन्नाट फिचर्स आहेत. यामध्ये 27 स्मार्ट कनेक्टेड फिचर्स असून ही एमपीव्ही 3 व्हेरिअंटमध्ये येते. Kia Carnival मध्ये 202 लीटरचे डिझेल 4 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 198 एचपी ताकद आणि 440 एनएमचा टॉर्क उत्पन्न करते. यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. आणखी एक भन्नाट फिचर म्हणजे या कारमध्ये लॅपटॉप किंवा तत्सम उपकरणही चार्ज करता येणार आहे. कार्निव्हलची किंमत 24. 95 लाखांपासून सुरू होत असून 7, 8 आणि 9 सीटर अशीही ही एमयुव्ही मिळणार आहे. सर्वात महाग मॉडेल लिमोझिनची किंमत 33.95 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. 

Web Title: Kia India's awesome offer; If you don't like the car Kia Carnival MPV, return it in 30 days ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.