500KM रेंज देणारी इलेक्ट्रिक SUV, 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 200KM धावेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 01:36 PM2023-03-29T13:36:42+5:302023-03-29T13:43:13+5:30

Kia EV9 Range : लँड रोव्हरची आठवण करून देणारी ही मोठ्या साइजची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.

kia ev9 flagship electric suv with 500km range introduced | 500KM रेंज देणारी इलेक्ट्रिक SUV, 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 200KM धावेल

500KM रेंज देणारी इलेक्ट्रिक SUV, 15 मिनिटांच्या चार्जमध्ये 200KM धावेल

googlenewsNext

नवी दिल्ली : किआने (Kia) आपली सर्वात मोठी इलेक्ट्रिक एसयूव्ही Kia EV9 सादर केली आहे.  काही दिवसांपूर्वी Kia ने EV9 चे प्रोडक्शन व्हर्जन दाखवले होते. याशिवाय भारतात ऑटो एक्सपो 2023 मध्ये कारची कॉन्सेप्ट व्हर्जन दाखवण्यात आली होती.  या 3-रो इलेक्ट्रिक एसयूव्हीला 99.8 kWh बॅटरी पॅक मिळतो आणि एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त धावण्याचा कंपनीचा दावा आहे.  Kia EV9 ला बॅटरी साइजचे दोन ऑप्शन सादर करण्यात आले आहे. लँड रोव्हरची आठवण करून देणारी ही मोठ्या साइजची इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.

कारच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये 76.1kWh बॅटरी आहे, जी रियर-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येईल. दुसरे व्हर्जन 99.8 kWh च्या मोठ्या बॅटरीसह येते. तसेच, RWD आणि AWD या दोन्ही व्हर्जन उपलब्ध आहे.  Kia EV9 सिंगल चार्जमध्ये 541 किलोमीटरपर्यंतची रेंज ऑफर करेल. फास्ट चार्जिंगद्वारे ही कार 15 मिनिटांत 200 किलोमीटरहून अधिक धावू शकते.  या एसयूव्हीची लांबी पाच मीटरपेक्षा जास्त आहे.

मोठी साइज असूनही कारचा शानदार परफॉर्मेंस ऑफर करते. लाँग रेंज मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक मोटर 201 hp पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. ही कार 9.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. तर स्टँडर्ड मॉडेल 8.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग प्राप्त करू शकते. सर्वात शक्तिशाली AWD व्हेरिएंटमध्ये ट्विन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत, जे 380 hp पॉवर आणि 600 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकतात.

ADAS लेव्हल 3 चे फीचर
Kia ने सांगितले की, ADAS लेव्हल 3 टेक्नॉलॉजी EV9 इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये उपलब्ध असणार आहे. ड्रायव्हिंग सुलभ होण्यासाठी कारच्या आजूबाजूला 15 सेन्सर लावण्यात आले आहेत. सेन्सर्समध्ये लिडर लेझर सेन्सर, कॅमेरा, रडार आणि अल्ट्रासोनिक्सचा समावेश असेल.  Kia EV9 मधील इतर फीचर्समध्ये ब्लाइंड-स्पॉट कोलिजन अवॉइडेंस असिस्ट, नेव्हिगेशन-बेस्ड स्मार्ट की, क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग असिस्ट सिस्टम यांचा समावेश असणार आहे.

असे असतील फीचर्स
Kia EV9 मध्ये  6 किंवा 7 सीट कॉन्फिगरेशनमध्ये आणले आहे. कारच्या डॅशबोर्डमध्ये तीन स्क्रीन आहेत. यामध्ये 12.3-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीन, त्याच साइजचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि तिसरा 5.0-इंचाचा डिस्प्ले मिळतो.  Kia 14-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम, एंबियंट लाइटिंग, मोठा सनरूफ आणि मसाज फंक्शन सीट मिळते. मधल्या लाइनमध्ये कॅप्टन सीट आहे, ची 180 अंशांपर्यंत फिरवली जाऊ शकते.

Web Title: kia ev9 flagship electric suv with 500km range introduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन