शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या मायलेजसाठी स्कूटरचा वेग ठेवा संतुलित व स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 07:00 IST

जेव्हा भारतामध्ये या प्रकारच्या ट्युब्युलर चासीच्या स्कूटरचे हे पर्व सुरू झाले व त्यानंतर हाताने गीयर टाकण्याच्या पत्राशीट जोडून तयार केलेल्या टु स्ट्रोक स्कूटर कालबाह्य झाल्या.

ठळक मुद्देस्कूटर्स मायलेज देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.ताशी ४० ते ४५ कि.मी. वेग राखून त्या चालवल्या तर मायलेज मिळते.अति वजन व जास्त सीट घेणे हे देखील स्कूटरच्या शहरी मायलेजला कमी करणारे आहे.

सध्याच्या स्कूटर्स वजनाला हलक्या, फोर स्ट्रोक, ऑटोगीयरच्या आहेत. जेव्हा भारतामध्ये या प्रकारच्या ट्युब्युलर चासीच्या स्कूटरचे हे पर्व सुरू झाले व त्यानंतर हाताने गीयर टाकण्याच्या पत्राशीट जोडून तयार केलेल्या टु स्ट्रोक स्कूटर कालबाह्य झाल्या. वास्तविक नव्या स्कूटर्स चालवायला व हाताळायला सोप्या असल्याने महिलांनाही त्या सुविधाजनक वाटल्याने अशा स्कूटर्सचे राज्य आता सुरू झाले आहे. मोपेड्सचा जमानाही संपला. पण हे करीत असताना मायलेजबाबत मात्र सध्याच्या या नव्या पद्धतीच्या स्कूटर्स पूर्णपणे निराशा करणाऱ्या आहेत. कागदोपत्री कंपनीने सांगितलेले मायलेज मिळत नाही. लांबच्या पलल्यामध्ये ते मिळेल असे वाटते पण ते ही तितके चागले मिळत आहे असे दिसत नाही. यामुळे प्रश्न असा पडतो की इतकी किंमत मोजूनही केवळ आवश्यक आहे म्हणून अशा कमी मायलेज देणाऱ्या या स्कूटर्स का वापराव्यात?

स्कूटर्स मायलेज देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या स्कूटर्स वजनाला हलक्या करूनही मायलेज कमी देतात. पण मुळात सलगपणे मोकळ्या व सपाट रस्त्यावर ताशी ४० ते ४५ कि.मी. वेग राखून त्या चालवल्या तर मायलेज मिळते. मग शहर वा गावात या स्कूटर्सचे मायलेज मिळत नाही. त्यामुळे अनेक जण केवळ नाईलाज म्हणून स्कूटर वापरतात. खरे म्हणजे सलग किमान दहा कि.मी. स्कूटर चालवली गेली तर मायलेज किती हे तपासणे ठीक आहे,  कमी रनिंग होत असेल तर मायलेज मिळणे कठीण आहे.

शहरात सिग्नलला स्कूटरचे इंजिन बंद करणे, पुलावरून उतरताना एक्सलरेटर विनाकारण देऊ नये. स्कूटरचा वेगही हळू हळू वाढवणे व किमान वेग ताशी ४० ते ४५ कि.मी. पेक्षा न ठेवणे, स्कूटर ही रेसिंगचे साधन नाही, पीकअप चांगला असला म्हणजे सतत त्याच पीक अप घेऊन चालवण्याचा अट्टाहास करू नये. अति वजन व जास्त सीट घेणे हे देखील स्कूटरच्या शहरी मायलेजला कमी करणारे आहे. तेव्हा स्कूटर किफायती कशी ठरेल हे तुमच्या ड्रायव्हिंगवर अवलंबून आहे. 

टॅग्स :two wheelerटू व्हीलर