भारतीय बाजारात आता इलेक्ट्रीक वाहनांची नांदी सुरु झाली आहे. टाटानंतर दुसरी तिसरी कोणी नाही तर ब्रिटीश कंपनी एमजी मोटर्स आघाडीवर आहे. एमजीच्या ताफ्यात सध्याच्या घडीला तीन ईव्ही आहेत, तर चौथी ईव्ही उद्या लाँच होत आहे. एमजी सायबरस्टर ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार उद्या येणार आहे.
भारतीय बाजारात सायबरस्टर ईव्ही यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्येच दाखविण्यात आली होती. यामध्ये १०.२५ इंचाचा व्हर्च्युअल क्लस्टर, ७ इंचाचा इन्फोटेनमेंट स्क्रीन, ७ इंचाचा ड्रायव्हर टचस्क्रीन, बोस साउंड सिस्टम, वाय शेप स्पोर्ट्स सीट, १९ आणि २० इंचाचे अलॉय व्हील्स, पूर्णपणे इलेक्ट्रिक हूड आदी फिचर्स देण्यात आले आहेत.
सुपर कारमध्ये ७७ kWh ची शक्तिशाली बॅटरी आणि मोटर देण्यात आली आहे. यामुळे ही कार ५०७ किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. १४४ kW फास्ट चार्जरने ३८ मिनिटांत बॅटरी १० ते ८० टक्के चार्ज करता येते. या कारची मोटर एवढी शक्तीशाली आहे की ५१० पीएसची पॉवर आणि ७२५ न्यूटन मीटरचा टॉर्क प्रदान करते. या कारचा टॉप स्पीड टॉप स्पीड १९५ किमी प्रतितास आहे.
एमजीची ही कार ७० ते ७५ लाखांच्या किंमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच उद्याच या कारची खरी किंमत समोर येण्याची शक्यता आहे. टेस्लाची एक कार नुकतीच भारतात लाँच झाली आहे. तिची किंमत ६० लाखांच्या आसपास आहे. त्याच्या वरच्या श्रेणीतील एमजीची कार असल्याने किंमत थोडी जास्तच असणार आहे.