शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

Jeep Compass : 2000cc इंजिन असलेली SUV लाँच;  4X4 चे देखील फीचर, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 20:40 IST

Jeep Compass : कंपनीने आपल्या लोकप्रिय SUV जीप कंपासची 5 वी एनिव्हर्सरी एडिशन  (Jeep Compass 5th Anniversary Edition) लॉन्च केली आहे.

नवी दिल्ली : जीप इंडिया देशात पाच वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने, कंपनीने आपल्या लोकप्रिय SUV जीप कंपासची 5 वी एनिव्हर्सरी एडिशन  (Jeep Compass 5th Anniversary Edition) लॉन्च केली आहे. यामध्ये एक स्टँडर्ड मॉडेलपेक्षा वेगळे बनवण्यासाठी अनेक अतिरिक्त फीचर्स देण्यात आली आहेत. 

यामध्ये 5 वी एनिव्हर्सरी बॅजिंग आणि व्हीलला नवा रंग देण्यात आला आहे. या कारला 2000 cc चे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. फीचर्सच्या रूपात, 10.2-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 6 एअरबॅग्ज, 4X4 सुविधा मिळते. कंपनीने एसयूव्हीची बुकिंग सुरू केली असून, लवकरच या कारची किंमत जाहीर केली जाईल.

कंपासच्या एनिव्हर्सरी एडिशनमध्ये ग्रॅनाइट क्रिस्टल फिनिशसह 18-इंच अलॉय व्हील देण्यात आले आहेत. यात न्यूट्रल ग्रे अ‍ॅक्सेंट बॅजिंगसह मिरर आणि न्यूट्रल ग्रे रिंगसह नवीन ग्लॉस ब्लॅक ग्रिल देखील मिळतो. 5 व्या एनिव्हर्सरीचे बॅजिंग आत आणि बाहेरही पाहिले जाऊ शकते. आतील लेदर सीटला हलके टंगस्टन अॅक्सेंट स्टिचिंग मिळते.

इंटीरिअर आणि फीचर्स5 व्या एनिव्हर्सरी एडिशन कंपास टॉप व्हेरिएंटवर आधारित नाही, तरीही त्यामध्ये फीचर्सची एक लांबलचक लिस्ट आहे. ड्युअल-पॅनोरामिक सनरूफ, ऑटो एलईडी हेडलॅम्प, 10.1-इंचाचा इन्फोटेनमेंट टचस्क्रीन डिस्प्ले, 7-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, पॉवर्ड टेलगेट यांसारखे फीचर्स यात देण्यात आले आहेत. मात्र, यात पॉवर्ड फ्रंट पॅसेंजर सीट, 10.2-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा यासारख्या फिचर्सचा अभाव आहे.

इंजिन आणि ट्रांसमिशनजीप पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसह कंपास ऑफर करत आहे. 1.4-लिटर टर्बो-पेट्रोल 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोशी जोडलेले आहे, तर 2-लीटर डिझेलला 6-स्पीड मॅन्युअल मिळते. 9-स्पीड ऑटोमॅटिक वापरून डिझेल इंजिन 4WD सह देखील दिले जाते. CarDekho रिपोर्टनुसार, या एसयूव्हीची किंमत 25.24 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 28.24 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार