शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

एक्सलरेशनच्या कौशल्याने वाढवा तुमच्या कारचे मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 3:00 PM

कारच्या चांगल्या मायलेजसाठी अनेक बाबी कारणीभूत असतात, त्यापैकी एक म्हणजे एक्लरेटरचा वापर. योग्य व संतुलित एक्सलरेशन करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास नक्कीच फायदा होतो, हे ध्यानात ठेवा.

ठळक मुद्देचांगले वाहन चालवणे, ते चांगले राखणे हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे.इंजिनाद्नवारे तुमच्या कारचा वेग वाढू शकतो वा कमी होऊ शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी असणारी ही एक्सलरेटरची किमया आहेअनावश्यक एक्सलरेशन देणे यामुळे तुमच्या कारच्या वा वाहनाच्या मायलेजवर दुष्परिणाम होतो

वाहन चालवण्याची कला सर्वांनाच काही पहिल्यापासूनच जमते असे नाही, चांगले वाहन चालवणे, ते चांगले राखणे हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. अर्थात कार ही एका वस्तू नव्हे मालमत्ता नव्हे तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे ते एक साधन आहे.तितकेच नाही तर ती एक अशी जबाबदारी आहे की, तिचा वापर हा फायदेशीर, किफायतशीर आणि सुरक्षित ठरला तरच ते साधन खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरपू शकते अन्यथा कार हा पांढरा हत्तीही म्हणता येतो. यासाठीच कार चालवताना तुमच्या कारच्या वेगावर अतिशय नियंत्रण असणे गरजेचे आहे. एक्सलरेटर कुठे असतो, ते मागच्या एका लेखात सांगितले आहे. कारच्या इंधनाला इंजिनाच्या कामात किती प्रमाणात पुरवठा करायचा की ज्यामुळे त्या इंजिनाद्नवारे तुमच्या कारचा वेग वाढू शकतो वा कमी होऊ शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी असणारी ही एक्सलरेटरची किमया आहे. भारतात अजूनही अॅटोमॅटिक गीयरची सुविधा सर्व गाड्यांना आलेली नाही. अजूनही बऱ्याच अंशी मॅन्युअल गीयर असलेल्या कार बऱ्याच प्रमाणात अस्तित्त्वात आहेत. एक्सलरेशनचा वापर हा कारचा वेग वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या इंधन पुरवठ्यावरीत नियंत्रण असते.त्याचप्रमाणे गीयरचा वापर करताना कार सुरू केल्यानंतर ती पहिल्या गीयरवर टाकून हळूवार पुढे सरकवण्यासाठी पिहल्या गीयरच्या क्षमतेनुसार प्रमाणबद्ध असे इंधन देत त्या कारचा वेग ठेवावा लागतो. सर्वसाधारणपणे पाच गीयर हे पुढे जाण्यासाठी व एक रिव्हर्स गीयर कारला मागे घेण्यासाठी वापरला जातो. पुढे जाण्यासाठी असणाऱ्या प्रत्येक गीयरला वेगाच्या अनुषंगाने एक प्रमाण निश्चित असते. त्यानुसार त्या गीयरच्या ताकदीप्रमाणे वेग द्यायचा असतो. गीयरचे कार्य करताना एक्लरेटरचा वापर हा करावा लागतो मात्र कोणत्या गीयरला किमान वेग किती हे त्या त्या कारप्रमाणे ठरवावे लागते. डिझेल व पेट्रोल या दोन इंधनाच्या वापरामध्ये काहीसा फरक दिसतो. त्या त्या कारच्या ताकदीवरही म्हणजे इंजिनाच्या ताकदीवरही गीयरच्या वेगामध्ये किंचित फरक आहे. १००- ते १२०० सीसीच्या पेट्रोलच्या कारचा विचार केला तर सर्वसाधारणपणे पहिला गीयर टाकल्यानंतर ताशी १० कि.मी., दुसरा गीयर ताशी २० कि.मी., तिसरा गीयर ताशी ३० कि.मी., चौथा गीयर ताशी ४० कि.मी., तर पाचवा गीयर ताशी ४० कि.मी.च्या वर वेग ठेवता येतो. टॉपच्या गीयरला ताशी १० कि.मी., वेग ठेवायचा नसतो, त्या गीयरला तो वेग कामाचा नाही. कार बंद पडू शकते. या प्रमाणे रस्त्यावरील वाहतूक, वर्दळ यानुसार गीयर बदलून आपला वेग नियंत्रित करीत राहाताना तुम्हाला एक्सलरेटरचा दट्ट्या पायाने किती दाबावा ते ठरवावे लागते. ऑटोगीयर असताना मात्र केवळ ब्रेक व एक्सलरेटरचा वापर करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारच्या कारसाठीही एक्सलरेटरचा वापर किती महत्त्वाचा असतो, ते लक्षात घ्यावे. एक्सलरेट करताना हळू हळू वेग वाढवावा, आवश्यक त्या गीयरनुसार तो वेग कायम ठेवावा वा कमी करावा. वाहतूक वा वर्दळीच्या ठिकाणी वेगाची म्हणजे एक्सलरेटर विनाकारण दाबून व क्लचवर पाय दाबून गाडी पुढे सरकण्याच्या गतीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नये. वेग वाढवायचा असेल तेव्हाच एक्सलरेटरचा दट्ट्या दाबावा, आवश्यक तितका रेटा पायाने त्यावर द्यावा. न्यूट्रलवर कार असेल तर विनाकारण एक्लरेटर दाबू नये. त्याने इंधन वाया जाते.रस्त्यावरील स्थिती काय आहे, वेग वाढवण्याची गरज आहे की नाही, वेग नेमका किती कमी ठेवावा या बाबी लक्षात घेऊन एक्सलरेटरचा वापर करणे गरजेचे आहे. एक्सरेटर तुम्ही किती प्रमाणात, कोणत्या पद्धतीने वापरता त्यावरही मायलेज अवलंबून असते. उताराच्या रस्त्यावर विनाकारण एक्सलरेशन करणे, चढावावर आवश्यकतेपेक्षा अयोग्य गीयरचा वापर व अतिरिक्त एक्सलरेशन करणे, वेग स्थिर असतानाही एक्सलरेटरवर कमी अधिक दाब देत अनावश्यक एक्सलरेशन देणे यामुळे तुमच्या कारच्या वा वाहनाच्या मायलेजवर दुष्परिणाम होतो. मायलेज कमी मिळते. शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी, वाहतूक कोंडीमध्ये अतिशय संतुलीत पद्धतीने एक्सलरेशन दिले तरी त्याचे चांगले परिणाम दिसतात, म्हणूनच एक्सलरेटरचा वापर कसा केला जातो हे कौशल्य वाढवता येते व त्यातून तुमच्या कारचे मायलेजही...

टॅग्स :Automobileवाहनcarकार