शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भारतात इथेनॉलवर चालणारी पहिली कार लॉन्च, किफायतशीर अन् प्रदूषणमुक्त होणार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 14:56 IST

खरे तर, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे लोकांच्या खिशावरही मोठा ताण पडत आहे. यामुळेच, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

नवी दिल्ली - देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी मंगळवारी (11 ऑक्टोबर) इथेनॉलवर चालणारी पहिली कार देशात लॉन्च केली आहे. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवही उपस्थित होते. या कार लॉन्चिंगकडे महागड्या पेट्रोल आणि डिझेलला पर्यायम्हणून पाहिले जात आहे.  खरे तर, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे लोकांच्या खिशावरही मोठा ताण पडत आहे. यामुळेच, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

इथेनॉलवर चालणारी कार केवळ परवडणारी आणि स्वस्तच नसेल, तर तिच्या सहाय्याने पर्यावरणावर वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या वाईट परिणामांपासूनही संरक्षण होईल. ऊसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. उसाच्या उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. यामुळे देशात इथेनॉलचे उत्पादान मोठ्या प्रमाणावर केले जाऊ शकते.

यामुळेच केंद्र सरकार इथेनॉल या पर्यायाकडे गांभीर्याने पाहत आहे. इथेनॉलवर चालणारी वाहने रस्त्यावर आल्यानंतर इथेनॉलची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल. याच बरोबर, उसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. भारतामध्ये टोयोटाने पायलट प्रोजेक्टअंतर्गत फ्लेक्सी-फ्यूल स्ट्रॉन्ग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल (FFV-SHEV) म्हणून लॉन्च केली आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीToyotaटोयोटाcarकारBJPभाजपा