शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

दंडाची रक्कम वाढविल्याने भ्रष्टाचारही वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 5:47 AM

दिवाकर रावते : कोणतेही विशेष अधिकार नसल्याने राज्याचे परिवहन खाते अपंग असल्याची खंत व्यक्त

कल्याण : राज्याचे परिवहन खाते हे अपंग आहे. त्याला कोणतेही अधिकार नाहीत. केंद्रात वाहतूक विषयक कायदे करताना राज्याला विचारात घेतले जात नाही. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वाहन चालवताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून वसुल करायची दंडाची रक्कम वाढवली. त्याची अंमलबजावणी आमच्याकडून करुन घेतली जात आहे. दंडाची रक्कम वाढल्याने भ्रष्टाचाराला अधिक वाव मिळणार आहे, अशा शब्दांत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आपली नाराजी मंगळवारी व्यक्त केली.

कल्याण आरटीओ कार्यालयाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम उंबर्डे वाडेघरपार पडला. या वेळी रावते बोलत होते. ते म्हणाले की, यापूर्वी पाचशे रुपये दंड आकारला जात होता. त्यावेळी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलीस १०० रुपये घेऊन पावती फाडत नव्हते.

ते पैसे त्यांच्या खिशात जात होते. आता दंडाची रक्कम एक हजार रुपये आहे. त्यामुळे आता किती पैसे पोलिसांच्या खिशात जात असतील याचा विचार तुम्हीच करा. पोलिसांकडून होणाºया वसुलीमुळे आरटीओचे अधिकारी बदनाम होत आहेत.‘युतीचा निर्णय दोघेच घेणार’शिवसेना भाजप युतीच्या जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रकांत पाटील हे सांगत असल्याकडे रावते यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, पाटील हे आपण भाजपचा अध्यक्ष असल्याचे दाखवत आहेत. प्रत्यक्षात युतीचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चर्चेअंती होणार आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बोलले तरी त्याचा उपयोग होणार नाही.‘घरबसल्या मिळेल वाहन क्रमांक’च्परिवहन खात्यात अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून काही बदल करणे अद्याप बाकी आहे. वाहन क्रमांक घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात यावे लागणार नाही. तो आॅनलाइन घरच्या घरी मिळेल, अशी व्यवस्था करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे रावते यांनी सांगितले.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेRto officeआरटीओ ऑफीस