शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:34 IST

भारत जपानला मागे टाकत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या रुपात समोर आला आह. आता सध्या या क्षेत्रात अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र सातत्याने विस्तारताना आणि नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना दिसत आहे. आगामी ७ वर्षांत भारत जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. भारत जपानला मागे टाकत सध्या जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या रुपात समोर आला आह. आता सध्या या क्षेत्रात अमेरिका आणि चीन भारताच्या पुढे आहेत.

यासंदर्भात भाष्य करताना, नितीन गडकरी यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये ७ लाख कोटी रुपयांवर असलेला ऑटोमाईल बाजार आता २२ लाख कोटींवर पोहोचला आहे. सध्या अमेरिका ७९ लाख कोटी आणि चीन ४९ लाख कोटी रुपयांसह प्रत्येकी क्रमांक एक आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

सध्या सरकार 'टेक्नॉलॉजी फॉर लाईफ' या सूत्रावर आधारित तंत्रज्ञानावर भर देत आहे -या वेगाची अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर. सध्या इलेक्ट्रिक वाहने (EVs), हायड्रोजन इंधन आणि इतर पर्यायी इंधनांवर काम सुरू आहे. यामुळे केवळ पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होणार नाही, तर प्रदूषणही कमी होईल. सध्या सरकार 'टेक्नॉलॉजी फॉर लाईफ' या सूत्रावर आधारित तंत्रज्ञानावर भर देत आहे. म्हणजेच असे तंत्रज्ञान जे लोकांचे जीवन अधिक सोपे आणि चांगले बनवते.

नितीन गडकरी यांच्या मते, सरकार वाहतूक खर्च कमी करण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. सध्या भारतात मालवाहतुकीचा खर्च प्रचंड आहे. यामुळे वस्तू महाग होतात. हे कमी करण्यासाठी जलमार्गांचा वापर वाढवण्याची योजना आहे, कारण याचा खर्च रस्ते वाहतुकीच्या तुलनेत फार कमी आहे.

रस्ते वाहतुकीसाठी १० रुपये आणि रेल्वेसाठी ६ रुपये खर्च येतो. मात्र जलमार्गासाठी केवळ १ रुपयाच लागतो. असेही त्यांनी सांगिते याशिवाय, टाकाऊ स्टील स्लॅगचा वापर आता रस्ते बांधणीत केला जात आहे. हे क्षेत्र साडेचार कोटी लोकांना रोजगार देत असून, जीएसटी आणि निर्यातीद्वारे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : India's Auto Industry to Surpass US, China in 7 Years

Web Summary : India's auto market is booming, expected to lead globally in seven years. Gadkari highlights technology focus, reduced transport costs, and waste material use as key drivers for growth, creating jobs and boosting the economy.
टॅग्स :nitin bangudeनितीन बानगुडेBJPभाजपाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग