शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टायरमध्ये योग्य हवा हा मोटारीच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा घटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 22:05 IST

टायरमध्ये हवा कमीही नको व जास्तही नको. टायरमधील योग्य हवा हाच त्यावरचा उपाय आहे व तो कायम अंमलात आणला गेला पाहिजे.

मुंबई - मोटारीचा एकमेव भाग जो रस्त्याला स्पर्श करतो तो म्हणजे टायर. या टायरशिवाय मोटार कुचकामीच म्हणावी लागेल, हे टायरचे महत्त्व लक्षात घेतले तर टायरची निगा, दक्षता व सर्वात महत्त्वाची म्हणजे टायरमधील हवा अचूक वा योग्य असणे गरजेचे किती आहे, ते लक्षात यावे. साधारण कारचे वजन १००० किलोपेक्षा जास्त असते व त्यात प्रवासी, त्यांचे सामान यांचे वजन वेगळेच. बस, ट्रक आदी अवजड वाहनांचे वजनही प्रचंड असते. या सर्व घटकांचा भार पेलणे हे सोपे काम नाही. असा हा भारवाही टायर व त्या टायरचा खरा प्राण म्हणजे त्यातील हवा. ही योग्य नसली म्हणजे कितीतरी दुष्परिणाम होतात, अपघातही होऊ शकतो, मायलेज कमी होऊ शकते, मध्येच प्रवासांत खंडही पडू शकतो. यासाठीच डायरमध्ये योग्य हवा व हवेचा दाब असणे हे अतिशय गरजेचे आहे.

प्रत्येक कार, ट्रक वा बस यांचे त्यांच्या कंपन्यांनी भारमान लक्षात घेऊन टायरमध्ये हवा कशी व किती भराल ते माहिती पुस्तकात दिलेले असते. त्याचा तक्ता कारच्या पुढील दरवाजानजीक स्टिकरद्वारे लावलेला असतो. असे असूनही अनेकजण आपल्याला पाहिजे तशी हवा भरीत असतात. कारमध्ये हवा भरताना सकाळच्या वेळी विशेष करून प्रवासाला निघण्यापूर्वी थोडी कमी हवा भरा कारण नंतर ती हवा गरम होऊन प्रसरण पावते व त्यामुळे टायरमध्ये हवेचा दाब जास्त निर्माण होऊ शकतो. त्यातून होणारा त्रास वचवा. यासाठी हवा योग्य त्या प्रमाणात भरा. जास्त किंवा कमी भरू नका. लांबच्या प्रवासात कडक उन्हामधून जात असावल तर दोन-तीन तासांनी हवा तपासा. त्यासाठी विविध प्रकारचे गेज (हवामापक) बाजारात मिळतात. ते नेहमी जवळ ठेवा.य अनेकदा पंपावर असलेल्या गेजमध्ये फरक असू शकतो, दोषही असू शकतो. त्यामुळे शक्यतो स्वतःकडे एक हवामापक नक्की ठेवा.

ठळक मुद्देहवा कमी भरली तरी फरक पडतो व जास्त भरली तरी फरक पडतो.

- हवा कमी भरल्यास...ओल्या रस्त्यावर ब्रेक प्रत्यक्षात अंमल करण्यास काहीसा जास्त वेळ घेतो.कमी रस्ता सोडून कार सरकू शकते.ओव्हरस्टीअरिंग वा अंडरस्टिअरींग म्हणजे नियंत्रणावर फरक पडतो.सस्पेंशनच्या काही भागांवर ताण पडतो.कारची हालचाल करताना त्रास पार्किंग करताना कठीण जाते.टायरचे आयुष्य कमी होते.

- हवा जास्त भरल्यासग्रीप कमी होते. कारण हवा जास्त असेल तर जमिनीला त्याच्या कमी भागाचा स्पर्श होतो.गाडी टणाणण उडल्यासारखी चालतेड्रायव्हिंग कम्पर्ट कमी होतो.टायरचा आवाज जास्त येतोटायरच्या मध्यभागावर दाब जास्त येतो.खड्डे व खडकाळ रस्त्यावरून जाताना टायरचे नुकसान अधिक होऊ शकते.यामुळेच टायरमधील हवेची काळजी करायला हवी. मग तुम्ही नाय-ट्रोजन भरा किंवा सर्वसाधारण हवा भरा

- योग्य हवा भरण्यासाठी काय कराल?कारच्या माहिहतीपुस्तकामधील सूचना अंलात आणातुमच्या भागातील हवा उष्ण असल्यास टायरची हवाही वाढते, त्यामुळे हवा तपासादर दोन आठवड्याने सर्व टायरमधील हवा तपासा व योग्य हवा ठेवा.लांबच्या प्रवासाला निघताना सुरुवातीला कोल्ड प्रेशर ठेवा, नंतर हवा पुन्हा तपासून भरा वा कमी करा.थंडी, पावसाळा यामध्येही दुर्लक्ष करू नकाउन्हाळ्यात हवेचा दाब वाढून टायर फुटू शकतो, तेव्हा योग्य हवा कायम आहे की नाही ते पाहा.टायरची स्थितीही कशी आहे त्याचा अंदाज घ्या 

टॅग्स :Automobileवाहनcarकार